Mumbai Central Railway New Schedule From 1st August
लोकल प्रवाशांना मध्य रेल्वेचा मोठा दिलासा; ऑगस्टपासून लागू होणार नवं वेळापत्रक By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 3:09 PM1 / 7मुंबईकरांचा रेल्वे प्रवास आणखी सुखकर करण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वी रेल्वे फेऱ्या वाढवण्याची सूचना केल्यानंतर आता त्याची अंमलबजावणी होताना दिसत आहे.2 / 7मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवर होत असलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्य रेल्वेने नवीन वेळापत्रक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.3 / 7ऑगस्ट महिन्यापासून लागू होणाऱ्या या वेळापत्रकात लोकलच्या वेळांपासून ते फेऱ्यांपर्यंत मोठा बदल करण्यात आला आहे. लोकल रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.4 / 7ऑगस्टपासून लागू होणाऱ्या वेळापत्राकानुसार, दादर स्थानकातून १० लोकल फेऱ्या परळ स्थानकातून अतिरिक्त २४ फेऱ्या सुरू होणार आहेत. 5 / 7दादर स्थानकावरुन सोडण्यात येणाऱ्या १० फेऱ्यांमध्ये पाच अप आणि पाच डाऊन मार्गावरील फेऱ्या असणार आहेत. दादरमधील फलाट क्रमांक १०ची रुंदी वाढवल्यामुळे हे शक्य होणार आहे.6 / 7कल्याण-कसारासाठी आता दादर स्थानकातून लोकल सोडण्यात येणार आहेत. त्यामुळं सीएसएमटीहून सुटणाऱ्या लोकलचा खोळंबा टाळण्यासही मदत होणार आहे. 7 / 7दुसरीकडे, ठाणे स्थानकापर्यंत धावणाऱ्या सहा लोकलचा कल्याणपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे कळवा आणि मुंब्रामधील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications