By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 17:05 IST
1 / 7महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी सीएसटीएम येथील काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्याने मुंबईत मनसे विरुद्ध काँग्रेस संघर्ष पेटला आहे. 2 / 7पोलिसांनी तोडफोड केल्याप्रकरणी मनसेचे नेता संदीप देशपांडे यांच्यासह 7 ते 8 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.3 / 7आधी हा हल्ला अज्ञातांनी केला असल्याचं बोललं जात होतं. पण नंतर संदिप देशपांडे यांनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक केला असून इट का जवाब पथ्थर से मिलेगा’, असं ट्विट करत हल्ल्याची जबाबदारी घेतली.4 / 7मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे छायाचित्र जाळून निषेध केला. (छायाचित्र - चेतन ननावरे)5 / 7राज ठाकरेंनी बांगड्या घाला, अशा घोषणा देत युथ काँग्रेसने मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेसवर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला. (छायाचित्र - चेतन ननावरे)6 / 7माजी खासदार गुरूदास कामत, कृपाशंकर सिंह, भाई जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर एकवटले होते. (छायाचित्र - चेतन ननावरे)7 / 7हल्ल्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, 'हा हल्ला अत्यंत भ्याड स्वरुपाचा होता. केवळ सवंग प्रसिद्धीसाठी हा हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे'.