Join us

आकाशातून आरामात पाहता येणार संपूर्ण मुंबई! लंडन आयप्रमाणे BMC तयार करणार सर्वात मोठे फेरीस व्हील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 17:44 IST

1 / 8
२०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी आत्तापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात मुंबईच्या विकासासाठी ७४ हजार ४२७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
2 / 8
या अर्थसंकल्पात एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. ब्रिटनमधल्या प्रसिद्ध लंडन आय प्रमाणे मुंबईतही मुंबई आय या भल्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रस्ताव आहे.
3 / 8
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुंबईला लंडनमधील थेम्स नदीच्या दक्षिणेकडील तीरावरील कॅन्टीलिव्हर ऑब्जर्वेशन व्हीलप्रमाणे 'मुंबई आय' मिळणार आहे, असं म्हटलं.
4 / 8
'मुंबई आय'हे लंडन आयसारखेच असणार असून ते एक प्रमुख पर्यटन आकर्षण ठरणार आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी पार्टरनशिप मॉडेल अंतर्गत बांधला जाईल, असं मुंबई महापालिकेने सांगितले. याचे स्थान अद्याप निश्चित झालं नसली तरी यासाठी दोन ते तीन एकर जागा लागण्याची शक्यता आहे.
5 / 8
मुंबई आयमधून गजबजलेल्या शहराला पक्ष्यांच्या नजरेतून पाहता येणार आहे. हा प्रकल्प थेम्स नदीच्या काठावर असलेल्या १३५ मीटर लांबीच्या फेरिस व्हील, लंडन आयच्या मॉडेलनुसार बनवला जाईल.
6 / 8
मुंबई आयमध्ये वातानुकूलित, सीलबंद प्रवासी कॅप्सूल असण्याची अपेक्षा आहे. या फेरिस व्हीलचा उद्देश मुंबई शहरातील लोकांना आणि पर्यटकांना शहराचे विहंगम दृश्य दाखवणे हा आहे.
7 / 8
शिवसेना नेते रवींद्र वायकर यांनी २००८ मध्ये 'मुंबई आय' ची योजना मांडली होती. यानंतर २०२२ मध्ये एमएमआरडीएने हा प्रकल्प वांद्रे रेक्लेमेशन प्रोमेनेडमध्ये सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु स्थानिक लोकांच्या विरोधामुळे ही योजना पुढे ढकलण्यात आली होती.
8 / 8
दरम्यान, ३५ लाखांहून अधिक पर्यटक लंडन आय या जगातील चौथ्या क्रमांकाचे महाकाय चक्राला पाहण्यासाठी ब्रिटनला भेट देतात. यातून तिथल्या सरकारला दरवर्षी सुमारे ६०० कोटी रुपये मिळतात.
टॅग्स :MumbaiमुंबईMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाLondon Mayorलंडन महापौर