मुंबई - चेंबूरमधील प्रसिद्ध आर. के. स्टुडिओमध्ये अग्नितांडव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 22:34 IST
1 / 6मुंबईतील प्रसिद्ध आर. के. स्टुडिओला शनिवारी (16 सप्टेंबर ) दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. एका डान्स रिअॅलिटी शोच्या सेटवर ही आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे अग्नितांडव झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 2 / 6आगीत स्टुडिओतील काही भाग जळून खाक झाला. सेटसाठी लागणारे प्लायवूड या भागात होते व क्षणातच आगीनं रौद्र रुप धारण केलं 3 / 6अग्निशमन दलाचे 6 बंब आणि पाच टँकर्सनी दोन तासांच्या अथक मेहनतीनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. 4 / 6या अग्नितांडवामुळे परिसरात धुराचे मोठ-मोठे लोट पसरले होते. यामुळे घाटकोपर-ठाण्याकडे जाणा-या रस्त्यांवर वाहतूककोंडी निर्माण झाली होती. आगीची तीव्रता पाहता आणि खबरदारी म्हणून पोलिसांनी परिसरातील वाहतूक बंद केली होती. 5 / 6आर.के. स्टुडिओची स्थापना बॉलिवूडचे 'शो मॅन' सुप्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांनी केली होती. त्यांच्याच नावावरुन या स्टुडिओचे नामकरण करण्यात आले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बरोबर एक वर्षानंतर म्हणजे 1948मध्ये त्यांनी या स्टुडिओची स्थापना केली. 6 / 6या स्टुडिओचा पहिला सिनेमा 1948 साली रिलीज झालेला 'आग'. मात्र, बॉक्सऑफिसवर या सिनेमाला फारसं यश मिळालं नाही. यानंतर आर.के. स्टुडिओमध्ये 1949 मध्ये बरसात सिनेमाची निर्मिती करण्यात आली आणि या सिनेमाला रसिकांनी भरभरुन प्रेम केले. यानंतर आर.के. स्टुडिओनं 'बूट पॉलिश','जागते रहो', 'अब दिल्ली दूर नहीं' अशा अनेक सिनेमांची निर्मिती केली