mumbai ganesh visarjan 2022 in pics lalbaug cha raja kalachowki cha mahaganpati
PHOTOS: लालबागची शान...गणेशोत्सवाचा अभिमान! डोळ्यांत साठवून ठेवावेत असे मुंबईतील विसर्जनाचे विलोभनीय क्षण... By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2022 3:07 PM1 / 12राज्यात आज मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. मुंबईतील गणेशोत्सव लालबागच्या उल्लेखाशिवाय अपूर्णच. गेली दोन वर्ष कोरोनामुळे निर्बंध आलेल्या गणेशोत्सवावर यावेळी कोणतीही बंधनं नव्हती. त्यामुळे लालबाग परिसर आज पुन्हा एकदा पूर्वीसारखा गर्दी आणि गुलालानं न्हाऊन निघालेला पाहायला मिळाला. (सर्व फोटो- दत्ता खेडेकर)2 / 12काळाचौकीचा महागणपती चिंचोळ्या गल्लीतून मार्गस्थ होताना. (फोटो- दत्ता खेडेकर)3 / 12परळच्या लक्ष्मी कॉजेटचा लंबोदर गणपती (फोटो- दत्ता खेडेकर)4 / 12मुंबईचा राजा म्हणून ओळख असलेला गणेश गल्लीतील गणपतीवर पुष्पवृष्टी होताना टिपलेला क्षण (फोटो- दत्ता खेडेकर)5 / 12मुंबईचा राजाच्या मिरवणुकीनं लालबागमधील विसर्जन मिरवणुकीला दरवर्षी सुरुवात होत असते. (फोटो- दत्ता खेडेकर)6 / 12अखंड महाराष्ट्राचं दैवत असलेल्या आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला लालबागचा राजा मार्गस्थ होताना (फोटो- दत्ता खेडेकर)7 / 12लालबागच्या विसर्जन मिरवणुकीचा आनंद लुटताना चिमुकली. गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या..(फोटो- दत्ता खेडेकर)8 / 12लालबागच्या विसर्जन मिरवणुकीचा आनंद लुटताना चिमुकली. गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या..(फोटो- दत्ता खेडेकर)9 / 12कोरोनाच्या निर्बंधांनंतर दोन वर्षांनी यंदा पुन्हा एकदा लालबागचा परिसर असा गर्दीनं फुललेला पाहायला मिळाला. (फोटो- दत्ता खेडेकर)10 / 12कोरोनाच्या निर्बंधांनंतर दोन वर्षांनी यंदा पुन्हा एकदा लालबागचा परिसर असा गर्दीनं फुललेला पाहायला मिळाला. (फोटो- दत्ता खेडेकर)11 / 12लालबागचा राजा...गुलालाची उधळण अन् ढोलताशांचा गजर! 12 / 12लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचा थाट आणखी वाचा Subscribe to Notifications