Join us

Mumbai Local: लोकल प्रवासाचा आता घरबसल्या मिळणार पास; राज्य सरकारने जारी केली ई-लिंक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 8:11 PM

1 / 9
कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे पास देण्याची ऑफलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर आता ऑनलाईन ई-पास सुविधादेखील राज्य शासनाच्यावतीने सुरू करण्यात आली आहे.
2 / 9
https://epassmsdma.mahait.org याद्वारे ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास’ घरबसल्या उपलब्ध होणार आहे.
3 / 9
राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि नागरिकांना ई-पास देण्यासाठी वेब लिंक यापूर्वीच विकसित केली आहे. या वेब लिंकचा उपयोग करून आता मुंबईकरांना रेल्वे प्रवासासाठी ई-पास उपलब्ध होणार आहेत.
4 / 9
ही लिंक सर्व वेब ब्राऊजरवर उपलब्ध असेल. हा ई-पास मोबाईलमध्ये जतन करुन, रेल्वे तिकिट खिडकीवर सादर केल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून थेट मासिक प्रवास पास उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर पुन्हा ऑफलाईन पडताळणीची आवश्यकता राहणार नाही.
5 / 9
कोविड लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले, दुसरा डोस घेऊन किमान १४ दिवस पूर्ण झालेले या ई पाससाठी पात्र असतील. त्यांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांचे कोविड लसीकरण पूर्ण झाल्याची पडताळणी ह्या लिंकवर आपोआप होईल.
6 / 9
विशेष म्हणजे दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण न झालेल्या नागरिकांनी अर्ज केल्यास त्यांना १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच ई-पास उपलब्ध होईल.
7 / 9
पात्र नागरिकांनी https://epassmsdma.mahait.org ही वेब लिंक उघडावी. त्यावर Travel Pass for Vaccinated Citizens यावर क्लिक करावे. कोविड लसीकरणासाठी नोंदविलेलाच मोबाईल क्रमांक नमूद करावा.
8 / 9
मोबाईलवर एसएमएसद्वारे मिळालेला ओटीपी नमूद केल्यानंतर लाभधारकाचे नाव, मोबाईल क्रमांक, लाभधारकाचा संदर्भ क्रमांक असा तपशील आपोआप समोर दिसेल. त्यामध्ये ‘पास निर्माण करा’ (जनरेट पास) या पर्यायावर क्लिक करावे. त्यावर अर्जदाराचा तपशील, कोविड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याचा दिनांक असा सर्व तपशील आपोआप दिसेल.
9 / 9
या तपशिलामध्ये सेल्फ इमेज’ या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र अपलोड करावे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील ४८ तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास करीता एसएमएसद्वारे लिंक प्राप्त होईल, असा संदेश झळकेल. लिंक प्राप्त झाल्यानंतर ई पास मोबाईलमध्ये जतन करुन, रेल्वे तिकिट खिडकीवर सादर करावा, त्याआधारे रेल्वे पास प्राप्त करता येईल.
टॅग्स :localलोकलMumbaiमुंबईrailwayरेल्वे