Mumbai local will start for everyone from February 1 but read this rules
मुंबईची लोकल १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी सुरू होणार, पण 'हे' नियम एकदा वाचा By मोरेश्वर येरम | Published: January 29, 2021 1:30 PM1 / 6मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवा १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी सुरू होत आहे. याबाबतची घोषणा आज राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. पण मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. हे नियम आपण जाणून घेऊयात..2 / 6सर्व प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरू करण्यासाठी गर्दी होणार नाही व आरोग्याचे नियम पाळले जातील याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.3 / 6सर्व सामान्य प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल. 4 / 6सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत प्रवास करता येणार नाही. याची विशेष नोंद सर्वांनी घ्यायला हवी.5 / 6सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री ९ पर्यंतच्या वेळेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि राज्य शासनाने परवानगी दिलेल्यांनाच केवळ लोकलने प्रवास करता येणार आहे.6 / 6राज्य शासनाकडून याआधीच मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आलेला असल्यानं लोकल प्रवासावेळीही मास्क वापरणं बंधनकारक असल्याचं सांगितलं जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications