Join us

मुंबई मेट्रो 7 चे डबे बंगळुरूहून दाखल; आकर्षक डिझाईन तुम्हालाही आवडेल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 11:59 AM

1 / 5
मेट्रो-२ आणी मेट्रो-७ मार्गिकेसाठी आवश्यक असणारे मेट्रोचे डबे मुंबईत नुकतेच दाखल झाले आहेत. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी हे डबे बेंगळुरूवरून मुंबईमध्ये आणण्यात आले.
2 / 5
हे डबे वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) येथील एमएमआरडीएच्या मैदानावर ठेवण्यात आले आहेत.
3 / 5
दहिसर ते डी.एन.नगर या मेट्रो-२ अ आणि डी.एन.नगर ते मंडाले (मेट्रो-२ ब) आणि दहिसर (पूर्व) ते अंधेरी पूर्व या मेट्रो-७ मार्गिकांचे काम सध्या जलदगतीने सुरू आहे. मेट्रो-७ मार्गिकेचे आत्तापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाले असल्याने मेट्रो गाड्यांच्या निर्मितीलाही सुरूवात करण्यात आली आहे. नव्या वर्षामध्ये मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार असल्याने हे डबे मुंबईमध्ये आणण्यात आले आहेत.
4 / 5
या डब्यांची नोव्हेंबर २०१८ मध्ये आॅर्डर देण्यात आली होती, सुमारे १८ महिन्यांनंतर सोमवारी बेंगळुरूतील बीईएमएल कंपनीतून हे डबे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. हे डबे बीकेसीमध्ये दाखल झाल्यावर एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी त्याची पूजा केली.
5 / 5
. एमएमआरडीएने बीईएमएल या कंपनीसोबत नोव्हेंबर २०१८ मध्ये ३ हजार १५ कोटी रूपयांचा करार केला आहे. या कंत्राटाअंतर्गत १८ महिन्यांनंतर पहिला डबा मुंबईमध्ये दाखल झाला आहे.
टॅग्स :Metroमेट्रो