Mumbai monorail resumes today all you need to know before travelling
सात महिन्यांनंतर मोनो रेल धावली; आजपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल By कुणाल गवाणकर | Published: October 18, 2020 3:56 PM1 / 9कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर जवळपास सात महिन्यांनंतर मोनो रेलची सेवा सुरू झाली आहे.2 / 9कोरोनामुळे लागलेल्या ब्रेकनंतर आज अखेर मोनो रेल धावली. चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक मार्गावर मोनोरेल आजपासून सुरू झाली. 3 / 9मोनोरेलमध्ये सर्वांना प्रवेश असणार आहे. त्यामुळे बस सेवेवरील ताण काही प्रमाणात कमी होऊ शकेल.4 / 9शनिवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनीदेखील मोनोरेल सुरु करण्यापूर्वीच्या कामाची पाहणी केली.5 / 9राजीव यांनी वडाळा ते संत गाडगे महाराज चौक असा मोनोरेलने प्रवासदेखील केला.6 / 9क्यूआर स्कॅनिंगची पाहणी करत कोरोना काळात प्रवास करताना प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.7 / 9सुरुवातीला मोनोच्या दिवसाला १०० फेऱ्या होतील. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून फेऱ्या वाढवण्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल.8 / 9मोनो रेल प्रशासनाला सेवा सुरू करण्याची परवानगी १५ ऑक्टोबरला देण्यात आली.9 / 9कोरोना संकट येण्यापूर्वी मोनोरेलच्या दिवसभरात ११५ फेऱ्या होत होत्या. त्यातून ८०० प्रवासी प्रवास करत होते. आणखी वाचा Subscribe to Notifications