mumbai news 4 patients of swine flu are on life support in mumbai doctors have given this warning
Swine Flu : मुंबईकरांनो सावधान! कोरोनापाठोपाठ स्वाईन फ्लूचा धोका; रुग्णसंख्येत वाढ, 4 जण लाईफ सपोर्टवर By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 9:22 AM1 / 10पावसाळा सुरू झाला की अनेक आजार डोकं वर काढतात. मुंबईतील पावसामुळे आणि बदलणाऱ्या वातावरणामुळे अनेक आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सर्दी, ताप, मलेरिया यांसारख्या आजारांसह आता स्वाईन फ्लूचा (Swine Flu) प्रसार होत आहे. 2 / 10देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. असं असताना आता कोरोनापाठोपाठ स्वाईन फ्लूचा देखील मोठा धोका निर्माण झाला आहे. मुंबईमध्ये काही रुग्ण आढळून आल्याने मुंबईकरांना आता सावध राहण्याची गरज आहे. 3 / 10मुंबईमध्ये इन्फ्लूएन्झा H1N1 ची लागण झालेले किमान चार रुग्ण लाईफ सपोर्टवर आहेत. शहरात पुन्हा संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे ज्या लोकांची कोविड -19 चाचणी निगेटिव्ह येत आहे, त्यांनी एच1एन1 चाचणी करावी, असं आवाहन नागरिकांना डॉक्टरांकडून वारंवार केलं जात आहे. 4 / 10जुलैमध्ये इन्फ्लूएंझा H1N1 च्या 11 रुग्णांची नोंद करण्यात आली. तर जूनमध्ये दोन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तसेच, ओपीडीमध्ये दररोज स्वाईन फ्ल्यूची लागण झालेल्या किमान दोन ते तीन रुग्णांची नोंद केली जात असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 5 / 10कोरोनाप्रमाणेच H1N1 हादेखील श्वसनासंबंधातील आजार आहे. स्वाईन फ्ल्यूचाही कोरोनाप्रमाणेच 2019 मध्ये जागतिक महामारी म्हणून प्रादुर्भाव दिसून आला होता. पण कालांतरानं त्याचा प्रादुर्भाव कमी झाला. 6 / 10गेल्या आठवड्यात राज्यात H1N1 मुळे पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 10 जुलै रोजी पालघरच्या तलासरी येथील 9 वर्षीय मुलीचा मृत्यू स्वाईन फ्ल्यूमुळे झाल्याची घटना समोर आली आहे. 7 / 10शहरात, गेल्या तीन वर्षांत H1N1 च्या एकाही रुग्णाची नोंद करण्यात आली नव्हती. तर यापूर्वी 2020 मध्ये 44 आणि 2021 मध्ये 64 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. यामुळे लोकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 8 / 10TOI च्या रिपोर्टनुसार, कोरोनाच्या तुलनेत स्वाईन फ्लूवर उपचार करण्यासाठी अत्यंत प्रभावी औषधे उपलब्ध आहेत जसे की Oseltamivir. संसर्गजन्य रोग विशेषज्ञ असलेल्या डॉ वसंत नागवेकर यांनी गेल्या काही आठवड्यात अनेक प्रकरणांवर उपचार केले आहेत. 9 / 10नागवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे औषध चांगलं कार्य करते, जर ते 48-72 तासांच्या आत घेतलं गेलं तर गंभीरता टाळता येऊ शकते. बहुतेक प्रकरणांमध्ये, लक्षणे म्हणजे ताप, नाक गळणे, अंगदुखी, वरच्या श्वसनमार्गाचे संक्रमण आहे.10 / 10गंभीर लक्षणे असलेल्यांनी कोविड आहे असे समजून थांबू नये. तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या असं देखील नागवेकर यांनी म्हटलं आहे. स्वाईन फ्लूमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications