Join us

मुंबई : छात्र भारतीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 1:13 PM

1 / 9
गुजरातमधील दलित नेता जिग्नेश मेवानी आणि दिल्लीतील जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्या उपस्थितीत होणा-या मुंबईतील छात्रभारतीच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली.
2 / 9
विलेपार्लेच्या भाईदास हॉलमध्ये छात्र भारतीने राष्ट्रीय छात्र संमेलनाचे गुरुवारी (4 जानेवारी) आयोजन केले होते.
3 / 9
मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश लागू असल्याच्या कारणामुळे छात्रभारतीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली.
4 / 9
महाराष्ट्र बंदवेळी झालेल्या तोडफोड आणि जाळपोळीनंतर आज राष्ट्रीय छात्र संमेलनात जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद बोलणार होते.
5 / 9
भाईदास सभागृह परिसराला आले होते छावणीचं स्वरुप
6 / 9
छात्र भारतीच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही कार्यक्रम घेण्यावर ठाम असलेल्या छात्र भारतीच्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
7 / 9
छात्र भारतीचे अध्यक्ष दत्ता ढगे पोलिसांच्या ताब्यात.
8 / 9
छात्र भारतीचे अध्यक्ष दत्ता ढगे पोलिसांच्या ताब्यात.
9 / 9
आमदार कपिल पाटील यांनीही अटक
टॅग्स :Chhatra Bharatiछात्रभारतीJignesh Mevaniजिग्नेश मेवानीMumbaiमुंबई