Join us

Mumbai: हे खरंय... मरीन ड्राईव्हच्या रस्त्यावर चक्क बॅडमिंटन अन् स्केटींग, नो ट्रॅफीक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 12:53 PM

1 / 7
पोलिसांच्या वाहतूक शाखेने मुंबईकरांसाठी ‘संडे स्ट्रीट’च्या रूपात आगळ्यावेगळ्या ट्रीटचे आयोजन आजपासून सुरू केले आहे. मुंबईतील सहा रस्त्यांवर चार तासांसाठी म्हणजे सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत ‘नो ट्रॅफिक जाम’ ठेवण्यात आला. (छाया - सुशील कदम)
2 / 7
या रस्त्यांवर स्केटिंग, सायकलिंग, योगा आणि इतरही मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे तसेच खेळांचे आयोजन नागरिकांना करता आले, त्यातून सकाळी मरीन ड्राईव्हच्या रस्त्यावर सायकलींग, स्केटींग आणि बॅडमिंटन दिसून आलं. (छाया-सुशील कदम)
3 / 7
मुंबईत आज मरिन ड्राईव्ह नरिमन पॉईंटच्या दोराभाई टाटा मार्ग, वांद्रेत कार्टर रोड, गोरेगावचे माईंड स्पेस बँक रोड, अंधेरी डी. एन. नगरमध्ये लोखंडवाला मार्ग, मुलुंडच्या तानसा पाईपलाईन आणि पूर्व द्रुतगती मार्ग व विक्रोळीतील ब्रीजचा यात समावेश आहे. (छाया - सुशील कदम)
4 / 7
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आणि वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा यांची ही मूळ संकल्पना असून, २७ मार्चपासून आता प्रत्येक रविवारी मुंबईतील काही रस्त्यांवर हा उपक्रम राबविला जात आहे. (छाया- सुशील कदम)
5 / 7
त्यासाठी आवश्यक ती उपाययोजना पोलिसांकडून करण्यात आल्याचं दिसून आलं. पांडे यांनी या संकल्पनेबाबत सोशल मीडियावर पोस्ट केल्यापासून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता वाढली होती, ती आज सकाळी रस्त्यांवर दिसूनही आली. (छाया - सुशिल कदम)
6 / 7
सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारचे व्यवसायीक प्रमोशन, लाऊड स्पीकर, राजकीय किंवा धार्मीक कार्यक्रम, दारू पिणे, सिगरेट फुकणे किंवा कोणत्याही प्रकारची अस्वच्छता करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच याठिकाणी येण्यासाठी खासगी गाड्याच्या वापर न करता सार्वजनिक वाहतुक सेवेचा वापर करावा. कोरोना नियमांचे आणि पोलिसांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करणेही आवश्यक आहे. (छाया-सुशील कदम)
7 / 7
अनेकांनी त्यांच्या येथील स्ट्रीटचा यात समावेश करावा, अशी विनंती ट्विट करत आयुक्तांना केली. ज्याला पांडे यांनीदेखील होकारार्थी उत्तर दिले आहे, तर अनेकांकडून स्ट्रीटवरील फेरीवाले, कर्णकर्कश हॉर्न आणि अस्वच्छता पसरविणाऱ्यांवरदेखील कारवाई करण्याची मागणी केली. (छाया- सुशील कदम)
टॅग्स :Mumbaiमुंबईtraffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडी