Mumbai: Travel to 'AC' locals, from Mumbai to tomorrow's service
मुंबई : 'एसी' लोकलची सफर, उद्यापासून मुंबईकरांच्या सेवेत By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 3:02 PM1 / 19मुंबईत वातानुकूलित लोकलने प्रवास करण्याचं मुंबईकरांचं स्वप्न उद्यापासून प्रत्यक्षात उतरणार आहे. ( सर्व छायाचित्रे - दत्ता खेडेकर) 2 / 19 पहिली एसी लोकल उद्या दुपारी 2.10 वाजता अंधेरी येथून सुटेल आणि ती चर्चगेटपर्यंत धावेल. 3 / 19त्यानंतर अंधेरी ते विरार नियमित फेऱ्या चालविल्या जाणार आहेत. 4 / 19एसी लोकल सोमवार ते शुक्रवार अशी पाच दिवस चालणार असून शनिवार-रविवारी या लोकलला विश्रांती दिली जाणार आहे. 5 / 19 प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रे असतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही रेल्वे बोर्डाने दिली आहे. 6 / 19भारतीय बनावटीच्या या एसी लोकल आहेत7 / 19 किमान तिकीट दर 60 रुपये असून कमाल भाडे 200 रुपये राहणार आहे. 8 / 19दशकभराच्या प्रतीक्षेनंतर मुंबईकरांना वातानुकूलित लोकल प्रवासाची प्रत्यक्ष अनुभूती घेता येणार आहे. 9 / 19चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) ही एसी लोकल तयार करण्यात आली आहे.10 / 19 रेल्वे बोर्डापाठोपाठ पश्चिम रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्तांनी सुरक्षिततेबाबतचे प्रमाणपत्र दिल्यानंतर ही लोकल सेवेत येण्यावर शिक्कामोर्तब झाले. 11 / 19नाताळसोबतच माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या लोकल सेवेचा मुहूर्त साधला जात आहे. 12 / 19या लोकलला चर्चगेट ते मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली, भाईंदर, वसई, विरार असे थांबे देण्यात आले आहेत.13 / 19ही लोकलसेवा यशस्वी झाल्यास आयसीएफने आणखी ११ एसी लोकल बनविण्याची तयारी दर्शविली आहे.14 / 19पहिली एसी लोकल उद्या दुपारी २.१० वाजता अंधेरी येथून सुटेल आणि ती चर्चगेटपर्यंत धावेल.15 / 19एसी लोकल जलद मार्गावर चालविण्यात येणार असून फक्त सकाळची पहिली फेरी धिम्या मार्गावर चालेल. 16 / 19ही लोकल महालक्ष्मी स्थानकातून सकाळी ६.५८ वाजता सुटेल आणि बोरिवलीला धिम्या मार्गावरून स. ७.५० वाजता पोहोचेल.17 / 19बोरिवलीहून चर्चगेटपर्यंतची जलद सेवा स. ७.५४ वाजता सुटणार आहे.18 / 19पश्चिम रेल्वे प्रशासनाने मुंबईकरांना एसी लोकल पाहता यावी यासाठी मुंबई सेंट्रल स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर एसी लोकल उभी करण्यात येणार आहे. 19 / 19सोमवारी सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत ही लोकल मुंबईकर पाहू शकणार आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications