Join us

मुंबईकरांनो सावधान! लोकल ट्रेनच्या वेळेचा नियम मोडल्यास रेल्वे कायद्यानूसार होणार शिक्षा

By मुकेश चव्हाण | Published: January 30, 2021 1:55 PM

1 / 6
कोरोनामुळे १० महिन्यांपूर्वी बंद झालेली व त्यानंतर मर्यादित प्रवाशांसाठी सुरू असलेली मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली होणार आहे. मात्र, प्रवासाच्या वेळा मर्यादित असतील.लोकल सेवा बंद असल्याने सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
2 / 6
आता १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही, अशा वेळा आखून सगळ्यांसाठी उपनगरीय सेवा सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. विशिष्ट वेळांच्या मर्यादेत मुंबईतील लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात नुकतीच बैठक झाली होती.
3 / 6
मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवा १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी सुरू होत आहे. याबाबतची घोषणा आज राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. पण मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. सर्व सामान्य प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल. सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत प्रवास करता येणार नाही, असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
4 / 6
राज्य सरकारने आणि रेल्वेने मंजूर केलेली वेळ वगळता अन्य वेळेत सर्वसामान्यांनी प्रवास करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा, आयपीसी १८८ आणि रेल्वे कायदा यानुसार कारवाई होईल, असे मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी सांगितले.
5 / 6
विनागर्दीच्या वेळेत सर्वांना १ फेब्रुवारीपासून लोकलमुभा दिल्यानंतर संभाव्य गर्दी टाळण्यासाठी रेल्वे पोलिसांना एकूण २६५० सुरक्षा रक्षकांची अतिरिक्त रसद पुरवण्यात आली आहे. यात महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आणि होमगार्ड यांचा समावेश आहे. यांच्या जोडीला रेल्वे सुरक्षा दलाकडून ही गर्दी नियोजनाचे काम करण्यात येईल.
6 / 6
सायंकाळच्या सर्व महिला डब्यांमध्ये रेल्वे पोलिस नियुक्त करण्यात येणार असून कोणत्याही प्रवाशांना अडचण आल्यास त्यांनी १५१२ या रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा. सध्या गर्दी कमी असल्याने रेल्वे स्थानक आणि परिसरात गुन्हे करणाऱ्यांवर विशेष कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली.
टॅग्स :localलोकलMumbaiमुंबईMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliceपोलिस