Join us

मुंबईची वाढली शान; 'या' वास्तूंना मिळाला जागतिक वारशाचा मान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 4:39 PM

1 / 8
दक्षिण मुंबईतील व्हिक्टोरियन निओ गॉथिक आणि आर्ट डेको इमारतींचा समावेश युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचा समावेश आहे.
2 / 8
महाराष्ट्र पोलीस दलाच्या मुख्यालयाचा समावेश युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला आहे. बहरीनमध्ये सुरू असलेल्या युनेस्कोच्या बैठकीत याबद्दलची घोषणा करण्यात आली.
3 / 8
मरिन ड्राईव्ह येथील पहिल्या रांगेतील इमारतींना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा देण्यात आला आहे.
4 / 8
फोर्टमधील डेव्हिड ससून ग्रंथालयाला युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे.
5 / 8
चर्चगेट स्थानकासमोर असलेल्या इरॉस सिनेमाच्या वास्तूला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
6 / 8
एल्फिन्स्टन महाविद्यालयाचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आला आहे.
7 / 8
मुंबई विद्यापीठाच्या अत्यंत देखण्या वास्तूलाही जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे.
8 / 8
चर्चगेट स्थानकाच्या शेजारी असणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयाचा समावेशदेखील जागतिक वारसा स्थळात करण्यात आला आहे.
टॅग्स :Mumbaiमुंबई