Join us

'या' ठिकाणी सुरू झालं मुंबईतील सर्वात महागडं टॉयलेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 10:13 PM

1 / 5
मरीन ड्राईव्हवर आजपासून नवं टॉयलेट सुरू झालं आहे. हे मुंबईतील सर्वात महागडं टॉयलेट आहे. यासाठी 90 लाख रुपयांचा खर्च आला आहे.
2 / 5
मुंबईतील सर्वात महागड्या टॉयलेटची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. आज या टॉयलेटचं उद्घाटन झालं.
3 / 5
जिंदाल ग्रुपनं सीएसआरच्या माध्यमातून समाटेकच्या सहाय्यानं हे टॉयलेट उभारलं. या टॉयलेटच्या देखभालीचं काम मुंबई महानगरपालिकेकडे असेल.
4 / 5
मुंबई महापालिका पुढील दोन महिने टॉयलेटच्या वापरासाठी शुल्क आकारणी करणार नाही. त्यानंतर महापालिकेकडून शुल्क आकारणी करण्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल
5 / 5
सौरउर्जेवर चालणारं हे टॉयलेट अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुंबई महापालिका साधारणत: एका टॉयलेटच्या उभारणीसाठी 25 ते 30 लाख रुपये खर्च करते. त्यामुळे मरीन ड्राईव्हमधील टॉयलेट शहरातील सर्वात महागडं टॉयलेट ठरलं आहे.
टॅग्स :Mumbaiमुंबई