Nawab Malik: Nawab gave patience to Malik's daughter, strong support of NCP
Nawab Malik: मलिकांच्या कन्येस सुप्रिया सुळेंनी दिला धीर, राष्ट्रवादी पाठिशी खंबीर By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 11:09 AM1 / 11नवाब मलिक जिंदाबाद... ईडी मुर्दाबाद... मोदी सरकार हाय हाय... मोदी सरकार चोर है... महाराष्ट्र लढेगा मोदी हारेगा... महाराष्ट्र ना कधी दिल्लीसमोर झुकला ना कधी झुकणार... 2 / 11आवाज कुणाचा महाविकास आघाडीचा अशा जोरदार घोषणा व फलक फडकावत महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी, मंत्र्यांनी आणि पदाधिकार्यांनी व हजारो कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी पुतळा परिसर दणाणून सोडला.3 / 11राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याचाच संताप मुंबईत दिसून आला. 4 / 11नवाब मलिक यांना समर्थन देण्यासाठी व मोदी सरकारचा व त्यांच्या केंद्रीय यंत्रणांचा निषेध करण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातील मविआचे कार्यकर्ते मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ जमा झाले होते.5 / 11राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचे नेते, मंत्री आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा होऊन मोदी व ईडीच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. 6 / 11राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचाही येथे सहभाग दिसून आला. या आंदोलनात नवाब मलिक यांच्या कन्या निलोफोर मलिक खान याही सहभागी झाल्या होत्या. 7 / 11सुप्रिया सुळेंनी निलोफर यांना मिठी मारुन, गालावर हात फिरवून संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या पाठिशी असल्याचा धीर दिला. सुप्रिया आणि निलोफर यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 8 / 11सुप्रिया सुळेंनी अतिशय आस्थेनं निलोफर यांची विचारपूस करत त्यांना धीर दिल्याचं या फोटोवरुन दिसून येते. तसेच, नवाब मलिक जिंदाबाद, ईडी मुर्दाबाद या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. 9 / 11यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसेपाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे. 10 / 11गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सुप्रियाताई सुळे, महिला प्रदेशाध्यक्षा व महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, हेही उपस्थित होते. 11 / 11काँग्रेस नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, खनिज व बंदरमंत्री अस्लम शेख, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) सतेज ऊर्फ बंटी पाटील, आदिवासी मंत्री के. सी. पाडवी, लोकभारतीचे शिक्षक आमदार कपिल पाटील, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, प्रवक्ते सचिन सावंत, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, माजी खासदार हुसेन दालवाई हेही हजर होते. आणखी वाचा Subscribe to Notifications