NCP should form an alliance with Shiv Sena, our best wishes to Jayant Patil, nana patole
'राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत युती करावी, जयंत पाटलांना आमच्या शुभेच्छा' By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 4:37 PM1 / 10राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी कायमस्वरुपी झालेली नाही. राज्यात पाच वर्षांसाठी तिन्ही पक्षांची आघाडी झालेली आहे, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.2 / 10राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधल्यानंतर नाना पटोले यांनी हे विधान केलं आहे. 3 / 10केवळ निवडणुकीसाठी स्वबळाची घोषणा करणाऱ्याला अर्थ नाही. जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठीचं स्वबळ पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण व्हायला हवं, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. 4 / 10याबाबत नाना पटोले यांना विचारण्यात आलं असता मुख्यमंत्र्यांनी भाषणातून नेमका कुणाला सल्ला याची स्पष्टता झालेली नाही, असं म्हटलं आहे. 5 / 10काँग्रेससोबत भाजपनंही स्वबळाची नारा दिला आहे. याआधीही भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वबळावर निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत. त्यामुळे यात काहीच गैर नाही, असंही ते म्हणाले. 6 / 10महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. तिघांनी एकत्र राहिले पाहिजे. परंतु कोणी स्वबळाची भाषा करत असेल तर उरलेले दोन पक्ष एकत्र राहतील असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(NCP Jayant Patil) यांनी स्पष्ट केले आहे.7 / 10जयंत पाटील यांच्या विधानावरही नाना पटोले यांनी आपली भूमिका मांडली आहे. जयंत पाटील यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असे नानांनी म्हटलं. 8 / 10कोरोना काळात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन काम केलंय. रक्तदान, ऑक्सिजन पुरवठा, मास्क वाटप, प्लाझ्मा दान अशी अनेक कामं काँग्रेसनं केली आहेत. 9 / 10स्वबळाचा नारा केवळ काँग्रेसनंच नाही तर शिवसेनेनंही दिला आहे. पण फक्त काँग्रेसला टार्गेट करण्याचं काम सुरु आहे. मी सामना वाचत नाही. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कुणाला त्रास का व्हावा? 10 / 10आम्ही जयंत पाटील यांनाही शुभेच्छा देतो की, त्यांनी शिवसेनेसोबत युती जाहीर करुन टाकावी, अशा शब्दात नाना पटोले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलंय. आणखी वाचा Subscribe to Notifications