The NIA fears that Sachin Waze will escape if he is kept under house arrest
Sachin Vaze: ...तर सचिन वाझे फरार होऊ शकतो; NIAनं व्यक्त केली भीती, न्यायालयानेही स्पष्टच सांगितलं! By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 12:53 PM1 / 5प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटालिया बाहेरील स्फोटकं आणि मनसूख हिरेन हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या बडतर्फ सहाय्यक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझेनं ह्रदयावर शस्त्रक्रिया (ओपन हार्ट) झाल्यानंतर पूर्णपणे बरं वाटेपर्यंत घरातच नजर कैदेत ठेण्यात यावे, अशी मागणी करणारा अर्ज केला आहे. मात्र सचिन वाझेंच्या या अर्जाला सोमवारी राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए)नं जोरदार विरोध केला. सचिन वाझेला घरात नजरकैदेत ठेवल्यास तो फरार होऊ शकतो, असा दावा एनआयएकडून करण्यात आला.2 / 5तळोजा कारागृहात असलेल्या वाझेला ह्रदयाचा त्रास असल्यानं 30 ऑगस्टला भिवंडी येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे वैद्यकीय उपचार केल्यानंतर त्यांच्यावर ओपन हार्ट शस्त्रक्रिया करण्याची गरज निर्माण झाल्यानं मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुणालयात त्याच्यावर 14 सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया पार पडली. 3 / 5शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर वाझेनं विशेष सत्र न्यायालयात वकिलांमार्फत अर्ज दाखल केला असून शस्त्रक्रिया झाल्यापासून पूर्णपणे बरे होईपर्यंत आपल्याला घरातच नजरकैदेत ठेवावं, अशी विनंती अर्जातून करण्यात आली आहे. त्याची दखल घेत न्यायालयानं एनआयएला त्यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार सोमवारी विशेष न्यायायलयात न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, एनआयएनं वाझेच्या अर्जाला विरोध केला. 4 / 5वाझेला घरातच नजर कैदेत ठेवल्यास तो फरार होण्याची शक्यताही बोलून दाखवली. तसेच तळोजा कारागृहात त्याच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी सर्व आधुनिक सुविधांची सोय करण्यात आल्याची माहितीही एनआयएच्यावतीनं देण्यात आली. त्याची दखल घेत न्यायालयानं वाझेचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देश रुग्णालय प्रशासनाला देत सुनावणी 29 सप्टेंबरपर्यत तहकूब केली. 5 / 5दरम्यान, अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या 20 कांड्या आणि धमकीचं पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील माने यांना एनआयएकडून अटक करण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications