No one will call Adani Ambani an 'outsider', says sanjay raut on parprantiye
'अदानी अंबानींना कोणी 'बाहेरचे' म्हणणार नाही' By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 9:54 AM1 / 12साकीनाका निर्भया प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 2 / 12त्यावर भाजपाने आक्षेप नोंदवला, याप्रकरणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात कांदिवलीतील समता नगर पोलिसात तक्रारही दाखल केली. त्यामुळे या मुद्द्यावरून शिवसेना विरुद्ध भाजपा हा संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. 3 / 12शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी याबाबत रोखठोक मत माडले असून आगामी महापालिका निवडणुकांसाठीच भाजपचा हा आटापिटा सुरू असल्याचे ते म्हणाले. 4 / 12'साकीनाक्यातील बलात्कार प्रकरणानंतर भाजपने परप्रांतीयांचा मुद्दा उकरून काढला. मुंबईत बाहेरून आलेल्यांवर लक्ष ठेवा, असे मुख्यमंत्री पोलिसांना सांगतात व त्याचे राजकीय भांडवल भाजपसारखे पक्ष करतात. 5 / 12हे राजकारण उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी व मुंबई महानगरपालिकेसाठी चालले आहे. एक दिवस हे लोक मराठी माणसालाच परप्रांतीय ठरवतील!', असे म्हणत भाजपावर टीकेचे बाण सोडले. 6 / 12मुंबईसारख्या शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सर्वच जाती-धर्मांचे, प्रांतांचे लोक राहतात. बंगाल, ओडिशा, आसाम, तामीळ, तेलुगू लोकांच्या येथे मोठय़ा वसाहती आहेत. 7 / 12माटुंगा-धारावीवर दाक्षिणात्यांचा मोठा पगडा आहे व ते परप्रांतीय म्हणून राजकीय नृत्य करताना दिसत नाहीत. शिवाजी पार्कात व इतरत्र वर्षानुवर्षे बंगाली समाज दुर्गापूजा करतो. 8 / 12त्याच वेळी शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा सुरू असतो, पण त्या बंगाली लोकांना कधीच परप्रांतीय म्हणून भय वाटले नाही. तामीळ, तेलुगू, मुसलमान आपापले सण-उत्सव साजरे करतात. 9 / 12मुंबई तर बऱ्याच अंशी गुजराती बांधवांनी व्यापली आहे. गुजराती, जैन, मारवाडी हे पिढय़ान्पिढय़ा मुंबई-महाराष्ट्राच्या जीवनप्रवाहाचे घटक बनले आहेत. मग मुंबईत भाजप परप्रांतीय कोणाला मानत आहे?10 / 12मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरांच्या आर्थिक नाडय़ा आज मराठी माणसांच्या हाती नाहीत. ज्यांच्या हाती आज त्या आहेत ते सर्वच राजकीय पक्षांना आर्थिक बळ देत असतात. 11 / 12श्रीमंतांना कोणीच परप्रांतीय, उपरे वगैरे मानत नाही. पण पोटासाठी भटकंती करणाऱ्या, मजूर वर्गाला परप्रांतीय म्हणून हिणवले जाते ही शोकांतिका आहे. 12 / 12अंबानी, अदानी, हिरानंदानी, रहेजा, कुकरेजा वगैरेंना कोणी 'बाहेरचे' म्हणणार नाही. राजकारण्यांत ते धाडसही नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications