Omicron: Corona patient rises to 20,000; Will there be lockdown in Mumbai from Saturday?
Mumbai Lockdown: कोरोना रुग्णसंख्या २० हजारांवर; शनिवारपासून मुंबईत लॉकडाऊन लागणार? By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2022 12:03 PM1 / 10देशात ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या आढळत आहे. त्यात मुंबईची परिस्थिती चिंताजनक आहे. मागील २४ तासांत २० हजाराहून अधिक कोरोनाबाधित मुंबईत आढळले. 2 / 10मुंबईतील वाढती रुग्णसंख्या पाहता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि आयुक्त इक्बाल चहल सिंह यांनी दिलेला इशारा खरा ठरण्याची शक्यता आहे. मुंबईत रुग्णसंख्या २० हजारांच्या वर पोहचली तर शहरात लॉकडाऊन लावण्याचे संकेत महापालिकेने दिले होते. 3 / 10त्यामुळे लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज निर्णय घेण्याची शक्यता आहे. शहरात २० हजारांच्या वर रुग्णसंख्या पोहचली तर लॉकडाऊन लावावा लागेल असं सांगण्यात आले होते. तर गुरुवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असं सांगितले आहे.4 / 10सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, यांच्यासह सचिव आणि इतर अधिकाऱ्यांसोबत एक बैठक झाली. त्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. 5 / 10राज्य सरकार मुंबईच्या आकडेवारीकडे लक्ष ठेवून आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनवर निर्णय घेण्याची शक्यता आहे. जर रुग्णसंख्येनं २० हजारांचा टप्पा ओलांडला तर पुन्हा केंद्राच्या नियमानुसार लॉकडाऊन करावा लागेल असा सूचक इशाराही महापौरांनी दिला होता. 6 / 10गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, वयस्करांना कोरोनाचा सर्वाधिक धोका पाहता कोरोनाच्या नियमावलींचे पालन करणं गरजेचे आहे. त्यामुळे ५५ वर्षाहून अधिक पोलीस अधिकाऱ्यांना कोरोना काळात ड्युटीवर येण्याची आवश्यकता नाही. ते त्यांच्या घरातूनच काम करु शकतात.7 / 10मागील २४ तासांत मुंबईत कोरोनाचे २० हजाराहून जास्त रुग्ण आढळले आहेत. त्यात धारावी, दादर, माहिम याठिकाणी संक्रमितांचा आकडा वाढला आहे. धारावीत २४ तासांत १०७, दादर २२३, माहिम ३०८ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.8 / 10तर महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा मागील २४ तासांत ३६ हजार २६५ इतका पोहचला आहे. यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सरकारनेही होम क्वारंटाईनच्या नियमात बदल केले आहेत.9 / 10भारतात एकूण रुग्णांपैकी ६७.२९ टक्के रुग्ण केवळ याच ५ राज्यात आढळले आहेत. एकूण रुग्णसंख्येपैकी ३०.९७ टक्के रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. भारतात मागील २४ तासांत ३०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ४ लाख ८३ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर मागील २४ तासांत सर्वाधिक २२१ मृत्यू केरळात झाले आहेत10 / 10रात्रीची संचारबंदी व वीक एंड लॉकडाऊनच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर टोपे म्हणाले की, या सर्वांच्या संदर्भात चर्चा झाली, पण कोणताही निर्णय घेतलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात अंतिम निर्णय घेतील. सर्व यंत्रणांसह संबंधित घटकांशी चर्चा करूनच असे निर्णय घेतले जातात असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications