Join us

ऑक्सिजन एक्सप्रेस 8 टँकर घेऊन विशाखापट्टणमला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 9:42 PM

1 / 9
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून देशभरात कोरोनाची दुसरा स्ट्रेन थैमान घालत आहे. त्यातच, ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.
2 / 9
रो-रो सेवा माध्यमातून 8 रिक्त टँकर असलेली मालगाडी आज कळंबोली माल यार्डमधून विशाखापट्टणम येथे पाठविण्यात आली.
3 / 9
कोविड-१९ विरोधातील लढ्याला सामोरे जाताना रेल्वेने ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्याची तयारी केली आहे .
4 / 9
टीम मुंबई विभागाने फ्लॅट वॅगन्समध्ये/मधून टँकर लोड/अनलोड करणे सुलभ होण्यासाठी कळंबोली माल यार्ड येथे २४ तासांच्या आत रात्रभरात रॅम्प तयार केला.
5 / 9
रो-रो सेवा ७ रिक्त टँकरसह असलेली मालगाडी वसई रोड, जळगाव, नागपूर, रायपूर जं मार्गे ईस्ट-कोस्ट रेल्वे झोनमधील विशाखापट्टणम स्टील प्लांट साइडिंगकडे जाईल.
6 / 9
जिथे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन असेल. ही गाडी आज 8.05pm ला कळंबोली यार्ड मधून रवाना झाली.
7 / 9
गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्येही रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली आणि पुरवठा साखळी कायम ठेवली आणि आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्राची सेवा सुरू ठेवली आहे.
8 / 9
कळंबोली मधून ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टणमसाठी 10 टँकर जाणार होते विशाखापट्टणमला. मात्र, 10 पैकी फक्त 8 टँकरच आता जाणार विशाखापट्टणमला.
9 / 9
तांत्रिक कारणामुळे 2 टँकर रिजेक्ट झाले आहे, तर 2 टँकर अजूनही उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे. संध्याकाळी उशीर सुटणार ही एक्सप्रेस, परिवहन मंत्री अनिल परब कलंबोळी रेलवे स्थानकाला देणार भेट आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसNavi Mumbaiनवी मुंबई