Join us

Parle-G: कोरोनाच्या संकटात 82 वर्षांची 'म्हातारी' धावली; गाठले विक्रीचे शिखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 1:30 PM

1 / 10
चहाच्या वाफाळत्या कपामध्ये पारले जीची बिस्किटे बुडवून त्याचा स्वाद चाखण्याची मजा काही औरच होती. मात्र, हीच पारले जी कंपनी काही महिन्यांपूर्वी मंदीच्या विळख्यात सापडल्याने बंद पडण्याच्या मार्गावर होती. मात्र, कोरोनाच्या लढ्याने या कंपनीमध्ये जीव ओतला आहे. गेल्या दोन महिन्यांत या कंपनीने बाजी लावत विक्रीचे शिखर गाठले आहे.
2 / 10
पारले जीने गेल्या अनेक वर्षांपासून बिस्किटांमुळे नाव कमावले होते. एनर्जी देणारी बिस्किटे असे त्याची ख्याती होती. आज हीच बिस्किटे कोरोनाच्या संकटात उपयोगात आली आहेत. लॉकडाऊन झाल्याने लाखो मजूर आपापल्या गावी उपाशी-तापाशी, तहानेने व्याकूळ होत निघाले होते. त्यांना पारले जीचा ५ रुपयांचा बिस्किट पुडा संजिवनी ठरला आहे.
3 / 10
भारतीय अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे लाखो नोकरदारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळत आहे. ऑटोमोबाईल श्रेत्रातील बेकारीनंतर खाद्य उत्पादनातही मंदीचे सावट जाणवू लागले होते. सुप्रसिद्ध आणि विश्वसनीय बिस्कीट ब्रँड असलेल्या पारले जी कंपनीतूनही कर्मचाऱ्यांची कपात होणार असल्याचं चित्र होते. पारले जी कंपनीत सध्या 1 लाख कामगार काम करतात.
4 / 10
प्रसिद्ध बिस्कीट ब्रँड पारले जी, मोनॅको, मिलानो, हाईड अँड सीक बिस्कीट आणि मँगो बाईट टॉफिजचा यांची एकत्रित उलाढाल जवळपास 10 हजार कोटी रुपयांची आहे. पारलेकडून उत्पादनाशी संबंधित 10 कंपन्या चालवल्या जात आहेत. या कंपनींच्या उत्पादनाची 50 टक्के विक्री ही ग्रामीण भागांतील बाजारपेठांवर अवलंबून आहे. कंपनी गेल्या डिसेंबरमध्ये १०००० कर्मचाऱ्यांची कपात करणार होती.
5 / 10
आज याच ग्रामीण भागाने पारले जीला पुन्हा फायद्यात आणले आहे. पारले कंपनीने विक्रीचा आकडा जाहीर केला नसला तरीही त्यांनी मार्च, एप्रिल आणि मे महिना गेल्या ८ दशकांतील सर्वात चांगला गेला असल्याचे म्हटले आहे.
6 / 10
कंपनीच्या बाजारातील हिस्सेदारीत ५ टक्क्यांनी वाढ झाली असून विक्रीमध्ये ८० ते ९० टक्क्यांची वाढ नोंदविली असल्याचे पारले कंपनीचे उत्पादन प्रमुख मयांक शाह यांनी सांगितले आहे.
7 / 10
लॉकडाऊनमुळे अडकलेले नागरिक बाजारात जे मिळेल ते घेत होते. मात्र, यासाठी ते परवडणारे पदार्थ निवडत होते. यामुळे कंपनीला फायदा झाला. पारले जी ची उत्पादने कोरोनाच्या संकटात उपलब्ध करण्यात आली.
8 / 10
फक्त पारले जीच नाही तर ब्रिटानियाच्या गुड डे, टायगर, मिल्क बिस्किट, बोरबॉन, मारीच्या विक्रीमध्येही मोठी वाढ झाली आहे. याचबरोबर पारलेच्या क्रॅकजॅक, मोनॅको, हाईड अँड सीक या बिस्किटांनीही मोठा वाट उचलला आहे.
9 / 10
पारले कंपनीमध्ये दिवसाला ४०० दशलक्ष बिस्किटे बनविली जातात. याबाबत काही गमतीदार किस्से आहेत. पारलेची महिनाभराची बिस्किटे एका बाजुला एक लावल्यास पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर कव्हर केले जाईल. तर वर्षाची बिस्किटे लावल्यास पृथ्वीला १९२ प्रदक्षिणा होऊ शकतात.
10 / 10
पारले कंपनी जास्तीत जास्त उत्पादन हे कंत्राटी पद्धतीने करून घेते. पारलेच्या १३० फॅक्टरी देशभरात आहेत. मात्र, यापैकी १२० फॅक्टरी या कंत्राटी तर केवळ १० फॅक्टरी या मालकीच्या आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या