Photos: Flag hoisting following social distance, bowing before martyrs, maharashtra day 1 may MMG
Photos: सोशल डिस्टन्स पाळून ध्वजारोहण, मुख्यमंत्र्यांनी हुतात्म्यांपुढे टेकला माथा By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 9:18 AM1 / 11महाराष्ट्रात स्वराज्य निर्मित्तीचा ध्यास घेतलेल्या राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेसमोर मुख्यमंत्र्यांनी नतमस्तक होऊन दिवसाची सुरुवात केली2 / 11राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोरही मुख्यमंत्र्यांनी माथा टेकून अभिावादन केलं3 / 11छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करुन, महाराष्ट्र दिनानिमित्त आदरांजली वाहिली. महाराजांपुढे माथा टेकून अभिवादन केलं4 / 11संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र राज्याच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज हुतात्मा चौक येथील त्यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.5 / 11यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव अजोय मेहता,प्रधान सचिव आशिष कुमार सिंह राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल तसेच वरिष्ठ शासकीय व पोलीस अधिकारी उपस्थित होते.6 / 11कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळत महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्यांना अभिवादन करुन, महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला 7 / 11महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिरंग्याला सलामी दिली8 / 11महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६० वर्ष पूर्ण झाले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन पुण्यात कार्यक्रम संपन्न झाला.9 / 11जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या ध्वजारोहण कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड चे महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोयी, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंग पाळून साधेपणाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.10 / 11महाराष्ट्राचा इतिहास संघर्षाचा आहे. महाराष्ट्रानं प्रत्येक संकटांचा यशस्वी मुकाबला केला आहे. 1967चा कोयना भूकंप, 1972चा दुष्काळ, 1993चा किल्लारी भूकंप, 2005ची अतिवृष्टी, महापूरासारख्या संकटांचा महाराष्ट्रानं यशस्वी मुकाबला केला. महाराष्ट्र कोरोनावरही लवकर विजय मिळवेल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले11 / 11कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशात पहिलं पाऊन महाराष्ट्रानं टाकलं. सार्वजनिक वाहतूकीवर बंदी, टाळेबंदीसारखे निर्णय महाराष्ट्रानं सर्वप्रथम घेतले. आर्थिक हानीचा विचार न करता नागरिकांचा जीव वाचवण्यास प्राधान्य दिलं. आज परराज्यातील साडेसहा लाख मजूरांच्या निवास, भोजन, वैद्यकीय सेवेची व्यवस्था शासकीय यंत्रणांमार्फत केली जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications