Photos of MNS chief Raj Thackeray and his house dogs are currently going viral on social media
राज ठाकरेंच्या बैठकीसह त्यांच्या घरातील श्वानांची देखील चर्चा; सोशल मीडियावर फोटो व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 9:26 AM1 / 8महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाऊबीजेच्या मुहूर्तावर नवीन घरात गृहप्रवेश केला. 'कृष्णकुंज' शेजारीच ही नवीन 'पाचमजली' इमारत बांधण्यात आली आहे. या नवीन घराचे नाव 'शिवतीर्थ' असून, सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज आहे. 2 / 8राज ठाकरेंनी शनिवारी प्रथमच शिवतिर्थावर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकित मनसेचे नेते यांच्यासह विविध शहरातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती. राज ठाकरेंनी बैठकित पदाधिकाऱ्यांना एक महत्वाची सूचना दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.3 / 8राज ठाकरेंनी शनिवारी प्रथमच शिवतिर्थावर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकित मनसेचे नेते यांच्यासह विविध शहरातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती. राज ठाकरेंनी बैठकित पदाधिकाऱ्यांना एक महत्वाची सूचना दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.4 / 8मनसेच्या बैठकीची चर्चा सुरु असताना सोशल मीडियावर राज ठाकरे आणि त्यांच्या श्वानांची देखील चर्चा होत आहे. राज ठाकरेंचं श्वान प्रेम तर जगजाहीर आहे. आता नव्या घरातही राज ठाकरेंच्या श्वानांची चर्चा आहे. राज ठाकरे हे श्वान प्रेमी असून, त्यांच्या घरात अनेक प्रजातीचे कुत्रे आहेत.5 / 8राज ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे नवीन घरात आपल्या लाडक्या श्वानांसोबत मज्जा करतानाचाही एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनाही तो फोटो खूप आवडलाय. राज ठाकरे आणि अमित ठाकरेंसोबत फोटोत दिसत असलेल्या श्वानांची नावं मुफासा आणि ब्लू अशी आहेत.6 / 8 आपल्या पाळीव कुत्र्यांची ते विशेष काळजी घेतात. कुटुंबातील एखाद्या सदस्यासारखी ते आपल्या पाळीव कुत्र्यांची काळजी घेतता. विशेष म्हणजे ते त्यांचे वाढदिवसही साजरे करतात. घरी पाहुणे येवो अथवा कार्यकर्ते त्यांची ओळख ते आपल्या कुत्र्यांसोबत नेहमीच करून देतात.7 / 8काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांच्या लाडक्या कुत्र्याचं निधन झालं आहे. त्यावेळी राज ठाकरे यांनी स्वतः परळच्या स्मशानभूमीत बाँडला अखेरचा निरोप दिला होता. 8 / 8राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरे देखील श्वानप्रेमी आहेत. देखील अनेकवेळा श्वानांसोबत खेळताना दिसून येतात. आणखी वाचा Subscribe to Notifications