Join us

Photos: राज ठाकरेंच्या 'नास्तिक' टिकेनंतर पवारांचे मंदिरातील फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 11:48 AM

1 / 10
मनसे प्रमुख राज ठाकरेंनी ठाण्यातील उत्तर सभेत पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नेत्यांवर तोफ डागली. विशेष म्हणजे शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला, भूमिका बदलण्याबद्दल त्यांनी बोलावं, असे म्हणत त्यांचा इतिहास सांगितला.
2 / 10
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) आपल्या भाषणात नेहमी शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र असल्याचे सांगत असतात. ते कुणीही नाकारू शकत नाही.
3 / 10
परंतु, शरद पवार कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताना दिसत नाही. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या आधी हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे.
4 / 10
शरद पवार नास्तिक, देव मानत नाहीत, देवळात हात जोडतानाचा फोटो सापडणार नाही, या शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता.
5 / 10
राज यांनी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊतांवरही जबरी प्रहार केला. त्यानंतर, राष्ट्रवादी समर्थकांनीही राज यांच्यावर सोशल मीडियातून टिका केली आहे.
6 / 10
शरद पवार यांच्यावरील टिकेला उत्तर देताना, अनेक राष्ट्रवादी समर्थकांनी शरद पवार यांचे मंदिरातील फोटो शेअर केले आहेत. हनुमान मंदिर, विठ्ठल मंदिर, श्री गणपतींसमोर शरद पवार हात जोडून उभे आहेत.
7 / 10
राष्ट्रवादी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतिश चव्हाण यांनीही शरद पवारांचे मंदिरातील फोटो शेअर केले आहेत. देवाच्या आशीर्वादाने सुर्योदयापासून लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शरद पवार सक्षम आहेत, असे कॅप्शनही त्यांनी लिहिलंय.
8 / 10
राष्ट्रवादी समर्थकांनी सोशल मीडियातून अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर हात जोडलेलाही फोटो दिसून येत आहे.
9 / 10
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे हे फोटो शेअर करत राज्यातील अनेक मंदिरांना शरद पवारांनीच निधी मिळवून दिल्याचं म्हटलंय. तसेच, काही मंदिरांचा जिर्णोद्धारही त्यांच्याच कार्यकाळात झाल्याचे सांगितले.
10 / 10
राज ठाकरेंनी शरद पवारांसह अनेक राजकीय नेत्यांवर जबरी टीका केली आहे. त्यामुळे, राज यांच्या टिकेला आता शरद पवार प्रत्युत्तर देतील का, हेच पाहायचे आहे.
टॅग्स :MumbaiमुंबईSharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे