Protests against the central government in the state, closed and sloganeering in some places
केंद्र सरकारविरोधात राज्यात निदर्शने, ठिकठिकाणी बंद अन् घोषणाबाजी By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2020 11:14 AM1 / 11भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यातही भाजपा वगळता इतर विविध राजकीय पक्षांनी एकत्र येत बंद पुकारला असून केंद्र सरकारविरोधी निदर्शने नोंदवली आहेत.2 / 11विरोधी पक्षांनी पुकारलेल्या बंदला जळगाव जिल्ह्यात प्रतिसाद मिळत आहे. जामनेर येथे सर्व दुकाने बंद आहेत. अमळनेर येथे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी रॕली काढून बंदचे आवाहन केले.3 / 11सानपाडा ट्रक टर्मिनल येथील ट्रकचालकांनाही आपल्या गाड्या जागेवरच लावल्या असून भारत बंदला पाठिंबा दिला आहे4 / 11ठाण्यातील अनेक भागात कडकडीत बंद पाहायला मिळत आहे, व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेऊन प्रतिसाद दिला आहे5 / 11ठाणे येथील कोपरी तसेच जांभळी नाका येथील मार्केट, तसेच कोपारित असणारी मार्केटमधील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत6 / 11नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात कृषीमंत्री तोमर यांचे पुतळ्याचे तिरडी आंदोलन करण्यात आले7 / 11लालबाग येथे कम्युनिष्ट मार्क्सवादी कार्यकर्त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला, भारत बंदमध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदवला8 / 11मानखुर्द येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधी घोषणाबाजी करत भारत बंदमध्ये सहभाग नोंदवला9 / 11केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करत, शेतकरी आंदोलनास राष्ट्रवादीनेही राज्यभरात पाठिंबा दर्शवला आहे10 / 11केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करत, शेतकरी आंदोलनास राष्ट्रवादीनेही राज्यभरात पाठिंबा दर्शवला आहे11 / 11केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करत, शेतकरी आंदोलनास राष्ट्रवादीनेही राज्यभरात पाठिंबा दर्शवला आहे आणखी वाचा Subscribe to Notifications