Join us

पावसाने केली मुंबई बंद

By admin | Published: June 19, 2015 12:00 AM

1 / 8
मुंबई व उपनगरांना जोडणा-या माटुंगा व सायन भागामध्ये सततच्या पावसाने वाहतुकीची अशी दैना केली.
2 / 8
कार्यालयांनी एरवी गजबजणा-या वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये शुक्रवारी सकाळी असे दृष्य होते.
3 / 8
पावसाने झोडपलेल्या मुंबईनजीकचा समुद्रही शुक्रवारी बेभान झाला आणि वरळी सागरी पुलाखाली असा लाटांचा थयथयाट झाला.
4 / 8
परिस्थितीचा आढावा घेताना मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता.
5 / 8
अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा अन्यथा घरातच थांबा अशा सूचना सरकारी अधिका-यांनी मुंबईकरांना दिल्या.
6 / 8
मुंबई शहरात व उपनगरात ठिकठिकाणी असं पाणी साचलं व वाहतुकीची कोंडी झाली.
7 / 8
मुंबईतल्या मुसळधार पावसाने तिन्ही उपनगरीय रेल्वे वाहतुकीची दाणादाण उडवली. चुनाभट्टी स्थानकातलं हे दृष्य.
8 / 8
रात्रभर पडलेल्या पावसाने मुंबईचं जनजीवन शुक्रवार ( १९ जून) सकाळपासून ठप्प केलं. मुंबईची उपनगरीय रेल्वे बंद पडली असूनही डोंबिवली स्थानकावर गाडी येईल अशी आशा बाळगून असलेले प्रवासी.