Rainfall Entry in Mumbai
मुंबईत पावसाची दणक्यात एन्ट्री By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 10:30 PM1 / 8वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने मुंबई उपनगर आणि ठाणे पट्ट्यात हजेरी लावली. (छाया- स्वप्नील साखरे)2 / 8आज सकाळपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण होते. संध्याकाळच्या सुमारास सोसाट्याचे वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.3 / 8आज सकाळपासून कोकण, नाशिक आणि महाबळेश्वरमध्ये टप्प्याटप्प्याने पावसाला सुरूवात झाली. यापैकी महाबळेश्वरमध्ये सध्या तुफान पाऊस कोसळत असून वेण्णा लेकला पूर आला आहे. गेल्या दोन तासांपासून याठिकाणी खंड न पडता मुसळधार पाऊस सुरू आहे.4 / 8ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, मुरबाड या भागांसह रायगड जिल्ह्यालाही पावसाने चिंब केले.5 / 8उकाड्याने हैराण झालेल्या लोकांनी पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद लुटला.6 / 8कोकणातील अनेक भागांमध्ये दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे येथील वातावरण आल्हाददायक झाले होते.7 / 8या तुलनेत नाशिक आणि कोकणातील पावसाचे आगमन नागरिकांसाठी सुखदायक ठरले. याठिकाणी सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली आहे. त्यामुळे सध्या येथील नागरिक आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेत आहेत. 8 / 8पावसाच्या सरीच्या शिडकाव्यांमुळे मातीचा सुगंध वातावरणात दरवळला. आणखी वाचा Subscribe to Notifications