raj and uddhav thackeray meets on balasaheb thackeray jayanti
बाळासाहेबांची जयंती... वेळ ६.२३... स्थळ मुंबई अन् महाराष्ट्रानं टिपली ठाकरे बंधूंच्या भेटीची खास फ्रेम By मोरेश्वर येरम | Published: January 23, 2021 6:57 PM1 / 10हाच तो क्षण...वेळ ६ वाजून २३ मिनिटं. मुंबईतील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एकाच मंचावरुन उपस्थितांचं हात जोडून अभिवादन स्विकारताना अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं. 2 / 10दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. 3 / 10बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने राज्यातील मातब्बर नेते यावेळी उपस्थित होते. 4 / 10शिवसेनेकडून मोठ्या जल्लोषात बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं गेलं. दक्षिण मुंबईत श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील मोक्याच्या जागेवर हा पुतळा उभारण्यात आला आहे.5 / 10मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि पक्षातील महत्वाचे नेते व मंत्री यावेळी उपस्थित होते. 6 / 10बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा साकारणारे ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांचा राज आणि उद्धव ठाकरे यांनी सन्मान केला. यावेळी शशिकांत वडके यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.7 / 10एकाच मंचावर उपस्थित असलेल्या ठाकरे बंधूंमधील बंधू प्रेम यावेळी उपस्थितांना पाहायला मिळालं.8 / 10राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात मंचावर काही मिनिटं बोलणं देखील झालं. राज यांच्या हाताच्या दुखापतीबाबत उद्धव यांनी विचारपूस केली असं दिसून आलं.9 / 10दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. 9 फूट उंचीचा पुतळा, 2 फूट उंच हिरवळ (लँडस्केप), चबुतऱ्यासह 11 फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे. 10 / 10दोन्ही हात उंचावून जनतेला अभिवादन करतानाची बाळासाहेब ठाकरे यांची चपखल कलाकृती शशिकांत वडके यांनी साकारली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications