Join us

Raj Thackerey: राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या खा. बृजभूषण यांचे फॉलोअर्स माहितीय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2022 6:41 PM

1 / 11
उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्येत प्रवेश करू देणार नाही, अशी घोषणा केली आहे.
2 / 11
राज ठाकरे यांनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी, आणि प्रभू श्रीरामांचे दर्शन घ्यावे. त्यांचे स्वागत करू, असेही त्यांनी म्हटले आहे.
3 / 11
राज ठाकरे जोवर माफी मागत नाहीत, तोवर त्यांची भेट घेऊ नये, असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे. आम्ही योगींचा सल्ला घेत नाही, तर त्यांना सल्ला देतो, असेही ते म्हणाले.
4 / 11
राज ठाकरे 5 जूनला अयोध्येत रामललाच्या दर्शनासाठी जाणार आहेत. मात्र, राम मंदिर आंदोलनाशी ठाकरे कुटुंबाचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही, असे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी म्हटले आहे.
5 / 11
खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी थेट धमकीच दिली आहे. त्यामुळे, राज ठाकरेंच्या दौऱ्याकडे आणि बृजभूषणसिंह यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खासदार सिंह यांनी तयारीही सुरू केली आहे.
6 / 11
खासदार ब्रिजभुषणसिंह कोण आहेत, त्यांचा किती दबदबा आहे, याची चांगलीच चर्चा महाराष्ट्रात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर बृजभूषण यांच्या ट्विटर अकाऊंटचा अभ्यास केल्यास त्यांचे केवळ 15 हजार 600 फॉलोवर्स आहेत.
7 / 11
बृजभूषण आणि राज ठाकरे यांच्या ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या पाहिल्यास बृजभूषण हे राज यांच्या कुठेही लागत नाहीत. कारण, राज यांचे ट्विटरवर तब्बल 1.3 मिलियन्स म्हणजे 13 लाख फॉलोअर्स आहेत.
8 / 11
बृजभूषण हे नोव्हेंबर 2018 मध्ये ट्विटरवर जॉईन झाले असून राज ठाकरे मे 2017 रोजी ट्विटरवर जॉईन झाले आहेत. त्यामुळे, राज ठाकरे किंवा मनसे खासदार सिंह यांच्या धमकीला किती गांभीर्याने घेते, हे पाहावे लागेल.
9 / 11
कैसरगंजचे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी एका पाठोपाठ एक ट्विट करत राज ठाकरेंवर हल्ला चढवला. तसेच, उत्तर भारतीयांचा अपमान केल्याचा आरोप करत, यासाठी राज ठाकरे यांनी माफी मागावी, अशी मागणीही केली आहे.
10 / 11
ट्विट करत ते म्हणाले, 'उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही. राज ठाकरेंनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून तमाम उत्तर भारतीयांची माफी मागावी.'
11 / 11
''राम मंदिर आंदोलनापासून ते मंदिर उभारण्यापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिन्दू परिषद आणि सर्वसामान्यांचीच महत्वाची भूमिका आहे. ठाकरे कुटुंबाचा याच्याशी कसलाही संबंध नाही,'' असेही बृजभूषण यांनी म्हटले आहे.
टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMember of parliamentखासदारBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश