Record of 21 species of gobid fish, survey of creeks at 25 sites by BNHS
२१ प्रजातींच्या गोबिड माशांची नोंद, BNHS कडून २५ स्थळांमधील खाड्यांचे सर्वेक्षण By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2022 11:07 AM1 / 10महाराष्ट्र वन विभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) ला महाराष्ट्रातील खारफुटी आणि खाडीपात्र क्षेत्रातील गोबिड माशांच्या विविधता आणि अधिवासाचा अभ्यास करण्यासाठी एक संशोधन प्रकल्प राबविण्यासाठी देण्यात आला होता. 2 / 10या प्रकल्पांतर्गत बीएनएचएसने जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२१ या कालावधीत हा अभ्यास केला आणि अभ्यासादरम्यान एकूण २१ प्रजातींच्या गोबिड माशांची नोंद करण्यात आली.3 / 10या अभ्यासादरम्यान २५ स्थळांचे सर्वेक्षण करण्यात आले ज्यामध्ये लहान ते मोठ्या खाड्या, मडफ्लॅट्स, कांदळवन आणि संबंधित अधिवास यांचा समावेश आहे. 4 / 10सर्वेक्षण केलेल्या काही प्रमुख खाड्यांमध्ये ठाणे खाडी, पनवेल, धरमतर, कुंडलिका, सावित्री, आंजर्ले, दाभोळ, जयगड, काजळी, वाघोटण आणि कराळी खाड्या आणि इतर अनेक लहानमोठ्या खाड्यांचा अभ्यास करण्यात आला.5 / 10 या अभ्यासाने महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील गोबिड माशांच्या विविधतेवर प्रथम आधारभूत माहिती निर्माण केली आहे त्यामुळे कांदळवनांच्या परिसंस्थेतील मत्स्यविविधतेचा एक प्रमुख घटक असलेल्या माशांच्या श्रेणीच्या ज्ञानातील अशा प्रकारे एक मोठी तफावत भरून निघाली आहे. भारताच्या पश्चिम किनार्यावरून प्रथमच नोंद झालेल्या प्रजातींच्या ७ नवीन नोंदी या अभ्यासात देण्यात आल्या आहेत6 / 10वीरेंद्र तिवारी, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष यांनी सांगितले की 'गोबिड माशांवर पहिल्यांदाच एवढ्या व्यापक प्रमाणावर अभ्यास केला गेला आहे आणि यामुळे आम्हाला महाराष्ट्रातील प्रमुख कांदळवन आणि नदीच्या किनारी भागात या माशांची विविधता आणि अधिवास समजून घेता आला आहे. 7 / 10 मला खात्री आहे की ह्या माहितीमुळे आपल्याला आपली कांदळवन परिसंस्था अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि त्यांच्या संवर्धनास मदत होईल'.8 / 10 बीएनएचएस मधील मत्स्यशास्त्रज्ञ उन्मेष काटवटे ज्यांनी अभ्यासप्रकल्पाचे नेतृत्व केले आहे असे म्हणाले की “गोबिड मासे हा माशांचा एक प्रतिष्ठित गट आहे, ज्यांच्या प्रजाती ओळखणे अत्यंत कठीण आहे. 9 / 10कारण बहुतेक प्रजाती वरवर सारख्याच दिसतात. Integrative taxonomic पद्धतीचा वापर करून या नवीन अभ्यासाने महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील गोबिड माशांच्या प्रजातींची पहिली माहिती समोर आणली आहे. 10 / 10या नवीन अभ्यासामुळे आम्हाला महत्त्वाच्या गोबी मत्स्यक्षेत्राचे वर्णन करण्यास मदत होईल आणि कांदळवनांच्या जैवविविधतेसाठी संवर्धन उपक्रमांना प्राधान्य देण्यात मदत होईल.” आणखी वाचा Subscribe to Notifications