Romantic pre-wedding shoots can be done here in Mumbai
मुंबईत इथं करु शकता रोमॅण्टिक प्री-वेडिंग शूट By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2018 2:08 PM1 / 5मुंबईतील सगळ्यात प्रसिद्ध असं ठिकाण म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. प्री-वेडिंग शूटसाठी हे ठिकाण एकदम परफेक्ट आहे. ब्रिटिशकालीन बांधकामाचं एक उत्तम नमुना आहे. इथं सायंकाळच्या वेळेस जरा जास्तच गर्दी असते. त्यामुळे कमी गर्दी असेल तेव्हाच इथं जा. शक्यतो सकाळी लवकर गेलात तर कमी गर्दी मिळेल, तसेच फोटो काढण्यासाठी उत्तम प्रकाशही मिळेल. 2 / 5बोरीवलीचं संजय गांधी नॅशनल पार्क हे कित्येक जोडप्यांसाठी हक्काचं ठिकाण आहे. त्यामुळे आपली पहिली भेट इथं झाली म्हणून कित्येक कपल्स आपलं प्री-वेडिंग शूट करायला इथंच येत असतात. मोठ्या परिसरात पसरलेल्या या पार्कमध्ये तुम्हाला तलावापासून ते हिरवळीपर्यंत सारं काही मिळेल. एवढंच नव्हे तर जरा पुढे गेलात तर तुम्हाला कान्हेरी लेणीही मिळेल3 / 5गिरगाव चौपाटीच्या अगदीच समोर असलेलं हे हँगिग गार्डनही प्री-वेडिंग शूटसाठी फार प्रसिद्ध आहे. चहूबाजूने पसरलेली झाडं तुमच्या फोटोला चांगला लूक देतील. पण सकाळी लवकर किंवा सायंकाळी जरा उशीराच इथं फोटो काढायला जा. कारण मधल्या वेळात इथं फार गर्दी असते. त्यामुळे तुम्हाला हवे तसे फोटो काढता येणार नाही. तिथं जवळच निपन सी रोड आहे. तिकडेही फोटो काढायला विसरू नका. तो भागही फार सुंदर आहे. 4 / 5याआधी मरिन ड्राईव्हविषयी खूप काही ऐकलंय, वाचलंय. त्यामुळे या स्थळाविषयी अधिक माहिती देण्याची गरज नाही. या परिसरात नैसर्गिकत: रोमॅन्टिक फिलींग येतं. त्यामुळे इकडे साधा सेल्फी काढायलाही मुंबईकरांना आवडतं. मग कुणाला आपल्या लाईफ पार्टनरसोबत इथं फोटोशुट करायला का नाही आवडणार?5 / 5जुहू बीच हे सुद्धा जोडप्यांसाठी एक प्रसिद्ध बीच आहे. त्यामुळे इकडे नेहमीच जोडप्यांची वर्दळ असते. तसंच, आजूबाजूलाही अनेक छान स्थळं असल्यानं फोटोग्राफर्स इथं प्री-वेडिंग फोटो शूट करण्याचा पर्याय देतात. सूर्यास्त होतानाचं दृष्य अत्यंत मोहक असतं. त्यामुळे एखादा सूर्यास्ताच्या वेळेत फोटो काढायला विसरू नका. आणखी वाचा Subscribe to Notifications