Join us

Rupali Chakankar : तुम्ही पेपर वाचला का? पवारांचा चाकणकरांना आजचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 6:35 PM

1 / 8
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद स्विकारल्यानं राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या.
2 / 8
जयंत पाटील हे एका कुटुंबप्रमुखाचं उत्तम उदाहरण, राज्यभरात संघटनेची बांधणी करत असताना अतिशय शांत आणि संयमीपणे आपण कार्यकर्त्यांना समजून घेत मार्गदर्शन करत असतात.
3 / 8
संघटनेची कार्यकर्ता म्हणून आपण जी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी काम करण्याची जबाबदारी मला दिली, त्याबद्दल मनःपूर्वक आभार, असे चाकणकर यांनी जयंत पाटील यांच्या भेटीत म्हटले.
4 / 8
चाकणकर यांनी आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. प्रसन्न सकाळमधील शरद पवार यांची प्रसन्न मुद्रा, देवघरातील विठुरायाच्या दर्शनाची अनुभुती देऊन गेल्याचं त्यांनी म्हटलं.
5 / 8
आयोगाच्या कामाची संपूर्ण माहिती सांगत, आयोगाशी, महिला पोलिसांशी संबधित राज्यभरातील घटनांबद्दल अनुभव सांगितले. यावेळी तुम्ही आजचा पेपर वाचला का? असे विचारत पवार यांनी स्वतः त्यांना पेपर वाचायला दिला.
6 / 8
त्या पेपरवरील लेख पाहून मला सुखद धक्काच बसला.'आक्रमक चेहरा' या शीर्षकाखाली माझ्याविषयीचा तो लेख होता, असा प्रसंग चाकणकर यांनी सांगितला आहे.
7 / 8
महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून करावयाच्या कामांबद्दल सल्ला व मार्गदर्शन मिळाले. शरद पवार यांच्या समृद्ध विचारांच्या व अनुभवाच्या विद्यापीठातील विद्यार्थीनी असल्याचा कायमच गर्व वाटतो, असेही चाकणकर यांनी म्हटलं.
8 / 8
चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली. त्यावेळी पक्ष विचार, मतभेद बाजूला ठेवून सर्वसमावेशक काम करून सर्व महिलांच्या प्रश्न व समस्यांना न्याय मिळेल, असे काम करण्याचा सल्ला दिला.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसWomenमहिलाPuneपुणे