Join us

Sachin Vaze: सचिन वाझे गावडे बनून हॉटेल ट्रायडंटमध्ये गेले; 'त्या' ४ दिवसांत काय काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 9:17 PM

1 / 10
उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार ठेवणाऱ्या सचिन वाझे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत.
2 / 10
राष्ट्रीय तपास यंत्रणेनं १३ मार्चला वाझे यांना अटक केली. तेव्हापासून आतापर्यंत वाझे यांच्याविरोधात एनआयएला भक्कम पुरावे सापडले आहेत. त्यामुळे वाझेंचा पाय खोलात गेला आहे.
3 / 10
मुकेश अंबानींच्या घराबाहेर सचिन वाझेंनीच स्फोटकं ठेवल्याचं एनआयएच्या तपासातून पुढे आलं. ही संपूर्ण योजना कुठे आणि कशी आखली गेली याचा तपास एनआयएनं सुरू केला आहे. या योजनेत आणखी कोणाचा सहभाग होता, याचीही चौकशी सुरू आहे.
4 / 10
स्फोटक प्रकरणाचं कनेक्शन ट्रायटंड हॉटेलशी संबंधित असल्याचा संशय एनआयएला आहे. याच ठिकाणी संपूर्ण कारस्थान रचल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे पुरावेदेखील एनआयएच्या हाती लागले आहेत.
5 / 10
मुकेश अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या अँटिलियाजवळ २५ फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली कार आढळून आली. त्याच्या ५ दिवस आधीपर्यंत वाझे हॉटेल ट्रायडंटमध्ये वास्तव्यास होते.
6 / 10
सचिन वाझे १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान ट्रायटंडमध्ये राहात होते. एस. एस. गावडे नावानं त्यांनी हॉटेलमध्ये एक खोली बूक केली होती.
7 / 10
विशेष म्हणजे हॉटेलमध्ये राहण्यासाठी वाझेंनी बोगस आधार कार्ड तयार केलं होतं. त्यावर फोटो वाझेंचा होता. पण नाव गावडे असं होतं.
8 / 10
एनआयएनं सध्या हॉटेलमध्ये तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिलं जात आहे. त्यातून काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत.
9 / 10
सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाझे दोन बॅगा घेऊन इनोव्हामधून येताना दिसत आहेत आणि हॉटेलमधून निघताना त्यांच्याकडे लँडक्रूझर प्राडो कार आहे.
10 / 10
हॉटेल ट्रायडंटमध्ये वाझेंना भेटायला कोण कोण आलं, त्यांच्या बॅगेत नेमकं काय होतं, याचा शोध सध्या एनआयएकडून घेतला जात आहे.
टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेMukesh Ambaniमुकेश अंबानी