Join us

Sachin Vaze: 'ती' स्फोटकं कुणी खरेदी केली? अखेर वाझेंनी माहिती दिली; एनआयएकडून महत्त्वाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 7:06 PM

1 / 10
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारमुळे एकच खळबळ माजली. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनाच राष्ट्रीय तपास यंत्रणेनं ताब्यात घेतल्यामुळे प्रकरणाला नवं वळण मिळालं.
2 / 10
राष्ट्रीय तपास यंत्रणेला सचिन वाझेंच्या विरोधात काही पुरावे मिळाल्यानं त्यांना १३ मार्चला अटक करण्यात आली. तेव्हापासून वाझेंच्या विरोधात एनआयएला भक्कम पुरावे सापडले आहेत. त्यामुळे दिवसागणिक वाझेंच्या अडचणी वाढत आहेत.
3 / 10
सचिन वाझेंनी स्फोटकांनी भरलेली कार सचिन वाझेंनीच अंबानींच्या निवासस्थानाजवळ पार्क केल्याचा संशय होता. मात्र स्फोटकं असलेली कार वाझे यांनी नाही, तर त्यांच्या खासगी ड्रायव्हरने पार्क केली होती, असं एनआयए तपासातून समोर आलं आहे.
4 / 10
सचिन वाझेंकडे जिलेटिनच्या कांड्या कुठून आल्या, त्या त्यांनी कुणाकडून खरेदी केल्या, अशा प्रश्नांचा शोध एनआयएकडून सुरू आहे. एनआयएमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओमध्ये आढळलेल्या कांड्या खुद्द वाझेंनीच खरेदी केल्या होत्या.
5 / 10
एनआयएच्या सुत्रांनी स्फोटकांबद्दल फारशी माहिती दिलेली नाही. मात्र वाझेंनीच ती खरेदी केली आणि त्यानंतर स्फोटकांनी भरलेली कार ड्रायव्हरला पार्क करायला सांगितली, असं एनआयएच्या तपासातून पुढे आलं आहे.
6 / 10
एनआयएनं पोलीस आयुक्तालय आणि परिसरातले सीसीटीव्ही फुटेज गोळा केले आहेत. यातून वाझेंच्या हालचाली दिसून आल्या आहेत.
7 / 10
पोलीस आयुक्तालयाचं सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर (DVR) सोबत छेडछाड करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. पण बहुतांश फुटेज उपलब्ध झालं आहे.
8 / 10
सचिन वाझे ठाण्यातल्या साकेत सोसायटीत वास्तव्यास होते. त्या सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेजदेखील नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचं सुत्रांनी सांगितलं.
9 / 10
पुरावे सापडू नयेत यासाठी सचिन वाझेंनी लॅपटॉप, प्रिंटर, हार्ड डिस्क, नंबर प्लेट, डेस्कटॉप, डीव्हीआर आणि सीपीयू या वस्तू मिठी नदीत फेकून दिल्या.
10 / 10
काही दिवसांपूर्वीच एनआयएनं मिठी नदी परिसरात सर्च ऑपरेशन केलं. यामधून बरेच महत्त्वाचे पुरावे एनआयएच्या हाती लागले. त्यामुळे वाझे आणखी अडचणीत सापडले आहेत.
टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेMukesh Ambaniमुकेश अंबानी