sachin vaze traveled from thane when mansukh hiren was killed says nia sources
Sachin Vaze: हिरेन यांची हत्या झाली त्यावेळी कुठे होते वाझे? 'दृश्यम' स्टाईल प्रयत्न फसला; डाव उलटला By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 7:27 PM1 / 10उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार उभी करण्याचा कट रचल्याप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अटकेत आहेत. त्यांच्या कोठडीत न्यायालयानं वाढ केली आहे. 2 / 10मुकेश अंबानींच्या घराखाली २५ फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळून आली. यानंतर याच कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्चला आढळून आला. हिरेन यांची हत्या वाझेंनीच केल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकानं दिली आहे.3 / 10हिरेन यांची हत्या झाली, त्यावेळी वाझे तिथेच उपस्थित होते असा संशय एनआयएला आहे. त्यादृष्टीनं एनआयएनं तपासदेखील केला. त्यात काही धक्कादायक माहिती पुढे आली. 4 / 10हिरेन यांची हत्या आपण केलीच नाही असं चित्र निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न वाझेंनी केला. ४ मार्चला रात्री हिरेन यांची हत्या झाली. त्यावेळी डोंगरी पोलीस स्टेशनच्या बाहेर ११.३० वाजता वाझे कारमधून उतरताना दिसत आहेत.5 / 10हिरेन यांची हत्या झाली, त्यावेळी आपण डोंगरी पोलीस स्टेशनमध्ये होतो. तिथल्या कर्मचाऱ्यांना याची कल्पना आहे, असं सांगता यावं आणि पुरावे निर्माण करता यावेत यासाठीच वाझेंनी रात्री ११.३० वाजता डोंगरी पोलीस स्टेशन गाठलं. तिथून ते एका बारवर छापा टाकण्यासाठी काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत गेले.6 / 10वाझेंचा प्लान अतिशय उत्तम होता. ठाण्यात हिरेन यांची हत्या झाल्यानंतर वाझे तडक निघाले. रात्री १०.३० वाजता ठाण्याहून निघालेले वाझे ११.३० वाजता डोंगरी पोलीस स्टेशनजवळ पोहोचले. फ्री वेवरून उतरताच डोंगरी पोलीस स्टेशन येतं. त्यामुळेच त्यांनी या पोलीस स्टेशनची निवड केली.7 / 10माजी पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदेंच्या मदतीनं हिरेन यांची हत्या केल्यानंतर वाझे डोंगरी पोलीस स्टेशनला पोहोचले. तिथे त्यांनी पोलीस अधिकारी रियाझुद्दीन काझी भेटले. वाझेंनी त्यांच्याकडून आपला फोन घेतला. हिरेन यांची हत्या झाली, तेव्हा आपण डोंगरी परिसरातच होतो असं चित्र निर्माण करण्याचा वाझेंचा प्रयत्न होता.8 / 10हिरेन यांची हत्या झाली तेव्हा आपण ठाण्यात नव्हतो, अशी दृश्यम स्टाईल कथा वाझेंनी रचली होती. पण वाझेंनी ठाण्यात असताना वापरलेल्या सिम कार्डची माहिती एनआयएनं मिळवली आणि संपूर्ण डाव फसला.9 / 10ठाण्यात असताना वाझेंनी वापरलेलं सिम कार्ड, त्याचं लोकेशन, गाडीचं जीपीएस लोकेशन मिळवत एनआयएनं महत्त्वाचे पुरावे मिळवले. त्यामुळे वाझेंचा संपूर्ण प्लान फसला.10 / 10सचिन वाझे ठाण्याहून एकटे गाडी चालवत डोंगरी पोलीस ठाण्याला आल्याचा जबाब पोलीस अधिकारी रियाझुद्दीन काझींनी एनआयएला दिला आहे. त्यामुळे अँटिलिया स्फोटक प्रकरणासोबतच मनसुख हिरेन हत्या प्रकरणातही वाझेंचा पाय खोलात गेला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications