Salman Khan arrives in Mumbai after granted bail by Jodhpur Court in Black Buck Poaching Case
भाईजान मुंबईत परतले; चाहत्यांचा घराबाहेर जल्लोष By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2018 10:37 PM1 / 8काळवीट शिकार प्रकरणातील दोषी सलमान खान शनिवारी न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर मुंबईत दाखल झाला. 2 / 8जोधपूर कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर सलमान मुंबईच्या दिशेने रवाना झाला आणि रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल झाला. 3 / 8मुंबई विमानतळावरून सलमान खानच्या गाड्यांचा ताफा गॅलेक्सी या निवासस्थानी पोहोचला. 4 / 8यावेळी सलमानला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. 5 / 8सलमान घरी पोहोचल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. चाहत्यांनी घोषणा देत, जल्लोष केला.6 / 8यावेळी सलमान खानने गॅलरीत येऊन चाहत्यांना झलक दिली आणि घरी जाण्याचे आवाहनही केले. यावेळी गॅलरीत सलमानसोबत वडील सलीम खान, आई, बहीण अर्पिता हेदेखील होते.7 / 8सलमान खानच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश रवींद्र कुमार जोशी यांनी आज निकाल दिला. 8 / 8सलमानला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या दोन जातमुचलक्यांवर जामीन मंजूर करण्यात आला. आणखी वाचा Subscribe to Notifications