Samir Wankhede greeting at Chaityabhoomi, shaking hands with leaders devendra Fadanvis
समीर वानखेडेंचं चैत्यभूमीवर सपत्नीक अभिवादन, फडणवीसांना हस्तांदोलन By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 4:29 PM1 / 10बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलाला म्हणजे आर्यन खानला क्रुझ ड्रग्जप्रकरणी अटक केल्यामुळे चर्चेत आलेले आणि नवाब मलिक यांच्यासोबतच्या वादामुळे वादग्रस्त ठरलेले एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंतीनिमित्त दादर चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केले. 2 / 10यावेळी, त्यांच्यासमवेत पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर याही होत्या. विशेष म्हणजे क्रांती यांनी पहिल्यांदाच १४ एप्रिलच्या जयंतीदिनी चैत्यभूमीवर येऊन अभिवादन केल्याचं त्यांनी म्हटलं. 3 / 10यावेळी, समीर वानखेडे यांच्यासोबत जनसेवेसाठी जो हातभार लावता येईल, तो नक्कीच लावेन, असेही क्रांती यांनी म्हटले. 4 / 10 समीर वानखेडे यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन चैत्यभूमीवरील अभिवादन करतानाचे फोटो शेअर केले आहेत. त्यासोबतच, कॅप्शनही लिहिलं आहे. 5 / 10मी काय आहे, मी फक्त तुमच्यामुळेच आहे. आमचा प्रत्येक श्वास तुमचा उधार आहे, असे म्हणत महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना सपत्नीक अभिवादन केल. 6 / 10समीर हे गेल्यावर्षी एकटेच अभिवादनासाठी गेले होते, मात्र या वर्ष सप्तनीक आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. यावेळी क्रांतीने सर्व आंबेडकरप्रेमींना महामानवाच्या १३२ व्या जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या. 7 / 10 याआधी इथे अनेकदा येणं झालं पण १४ एप्रिलला मी पहिल्यांदाच आले आहे. आज मी छान नटून- थटून एक सून म्हणून आले आहे आणि मलाही सगळ्यांनीच अगदी खुल्या मनाने स्वीकारले आहे.8 / 10चैत्यभूमीवर जोड्याने बाबासाहेबांना अभिवादन करायला आलेल्या समीर आणि क्रांती यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात समीर यांनी आज सगळ्यांना नवीन भीम भक्त पाहायला मिळाला, असे म्हणत क्रांतीचं कौतुक केलं. 9 / 10दरम्यान, यावेळी समीर वानखेडे यांनी चैत्यभूमीवर आलेल्या नेतेमंडळींशीही संवाद साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी हस्तांदोलन केले. तर, मंत्री दीपक केसरकर यांचीही भेट घेतली. 10 / 10दीपक केसरकर यांनी जनता नावाचे पुस्तक भेट देऊन समीर वानखेडे यांचा सन्मान केला. समीर वानखेडे यांची सपत्नीक चैत्यभूमीवर भेट सोशल मीडियातही चर्चेता विषय ठरली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications