Savarkar's intense patriotism inspiring, veterans pay homage to CM uddhv thackeray
सावरकरांची प्रखर राष्ट्रभक्ती प्रेरदणादायी, मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांनी वाहिली आदरांजली By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 12:04 PM1 / 10स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची आज 138 वी जयंती साजरी होत आहे. कोरोनाच्या सावटात सामाजिक, विधायक उपक्रमांनी देशभरात जंयती साध्याच पद्धतीने साजरी होत आहे. 2 / 10देशात अनेक ठिकाणी सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तर, काही ठिकाणी पुतळ्याला फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली.3 / 10सावरकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे 28 मे 1883 रोजी झाला. विचारवंत, लेखक, तत्त्वज्ञ, भाषाकार आणि स्वातंत्र्यसेनानी असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. 4 / 10सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी कवी व लेखक होते. तसेच स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी आणि हिंदुसंघटक होते.5 / 10 सावरकरांनी मराठी भाषेला अनेक शब्द प्रदान केले आहेत. त्यातील 'दिनांक' हा एक शब्द आहे. 6 / 10पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत अनेक दिग्गजांनी सावरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 7 / 10स्वातंत्र्याच्या लढाईतील महान क्रांतीकारक, प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. 8 / 10मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, मनसे प्रमुख राज ठाकरेंसह दिग्गजांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. 9 / 10स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रखर राष्ट्रभक्ती प्रेरणादायी आहे. उत्तम संघटक, साहित्यिक–प्रतिभावंत अशा या भारतमातेच्या थोर सुपुत्राला, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, असं ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलंय. 10 / 10विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करुन श्रद्धांजली अर्पण केली. स्वातंत्र्य लढ्यातील जाज्वल्य, शौर्यमूर्ती, थोर स्वातंत्र्यसेनानी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरजी यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन, असं त्यांनी म्हटलंय. आणखी वाचा Subscribe to Notifications