Self-reliant India ... Corona's 'vaccine goes abroad' from Mumbai airport
आत्मनिर्भर भारत... मुंबई विमानतळावरुन कोरोनाची 'लस निघाली परदेशाला' By महेश गलांडे | Published: January 20, 2021 9:04 AM1 / 10 देशात कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी भारतातील २ कोरोना लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. सीरम इंस्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन यांचा यात समावेश आहे.2 / 10 त्यानंतर भारतात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिमेलाही सुरुवात झाली असून देशभरात या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचे हे डोस देण्यात येत आहेत. 3 / 10 पुण्यातील सीरम इंस्टीट्युटमधून कोविशिल्ड लसीचे 3 ट्रक पहाटेच्या सुमारास रवाना झाले होते, त्यावेळी सोशल मीडियावर या फोटोंना चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे अनेकांनी हा कोरोनाविरुद्धच्या लढाईतील विजय असल्याचं म्हटंल. 4 / 10याच दरम्यान फिलीपींस सरकारने सीरम इंस्टिट्यूटसोबत मोठा करार केला आहे. या करारानुसार सीरम इंस्टिट्यूट फिलीपींसला ३० मिलियन म्हणजे ३ कोटी कोविशिल्ड कोरोना लसीचा पुरवठा करणार आहे.5 / 10 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील कोरोना लस उत्पादन करण्याची क्षमता मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत करण्यास तयार आहे असं सांगितले आहे.6 / 10 जगभरातील ६० टक्के लसीचं उत्पादन भारतात होतं, आजाराविरुद्ध वापरण्यात येत असलेल्या तीन लसींपैकी एका लसीवर मेड इन इंडिया शिक्का लागला आहे. संयुक्त राष्ट्र संघासारखी जागतिक संस्था त्यांच्या गरजेसाठी ६०-८० टक्के लस भारताकडून विकत घेते7 / 10 भारतामध्ये बनविण्यात आलेल्या कोरोना लसी मिळविण्यासाठी शेजारी देशांसह इतर खंडातील अनेक देशांनी आता प्रयत्न सुरू केले आहेत. या देशांना कोरोना लसीचा पुरवठा करण्याचा भारताचा विचार आहे. 8 / 10 कोरोना साथीवर कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन लस विकसित झाल्यानंतर आता हे देश भारताकडे आशेने पाहू लागले आहेत. कोरोना लसी घेण्यासाठी म्यानमार व दक्षिण आफ्रिका यांनी याआधीच भारताशी करार केला आहे. नेपाळ, श्रीलंका हे शेजारी देश तसेच कझाकस्तान हे कोरोना लस मिळविण्यासाठी भारताच्या संपर्कात आहेत.9 / 10 मध्य आशियातील देशांनाही कोरोना लसीचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करण्याची योजना भारताने आखली आहे. त्यामध्ये बांगलादेश, भूतान, मालदीव, व्हिएतनाम, कंबोडिया, किरगिझस्तान, उझबेकिस्तान या देशांचा समावेश आहे.10 / 10 भारताच्या या धोरणानुसार 1.5 लाख कोरोना लसींचे डोस भुतानला पाठविण्यात आले आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरुन विमानाने या लशींचे डोस भुतानमधील थिंपुआला पाठवले. आणखी वाचा Subscribe to Notifications