Join us

फळभाज्यांच्या ठसेकामातून शरद पवारांचे चित्र, अपंगांची कला

By महेश गलांडे | Published: December 29, 2020 4:03 PM

1 / 10
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची तरुणाईमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळते. शरद पवार यांच्या व्यक्तीमत्वामुळे प्रेरीत होऊन कित्येक तरुण राष्ट्रवादीत सामिल झाले आहेत.
2 / 10
सातारा येथील भर पावसात घेतलेल्या सभेची देशात चर्चा झाली, तर महाराष्ट्राची राजकीय समीकरणेच या सभेनं बदलून दाखवली. त्यामुळेही, पवारांवर प्रेम करणाऱ्या नवयुवकांची संख्या वाढली आहे
3 / 10
शरद पवार यांनी 80 व्या वर्षीही एखाद्या तरुणाला लाजवेल असे काम करत, विधानसभा निवडणुकांमध्ये पायाला भिंगरी बांधल्यागत प्रचार केला.
4 / 10
त्यामुळेच, 80 वर्षांचा तरुण, योद्धा म्हणूनही त्यांच्यावर प्रेम करणारे तरुण गावखेड्यात दिसू लागले.
5 / 10
शरद पवारांच्या या व्यक्तीमत्वाला आपल्या कलाकृतीतूनही अनेकजण सादर करतात. यापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील युवकाने शेतात बियांची पेरणी करुन शरद पवारांची कलाकृती निर्माण केली होती.
6 / 10
सोशल मीडियावरही शरद पवारांचे व्यंगचित्र, चित्र आणि विविध कलाकृती अनेकदा व्हायरल होत असतात.
7 / 10
काही दिवसांपूर्वीच पुण्यातील एका भिंतीवर पवारांचे पावसातील सभेचे चित्र साकारण्यात आल्याचे आपण पाहिले
8 / 10
आता, मुंबईतील कुलाबा येथील सेंट अँस गर्ल्स स्कुलमधील शबनम अन्सारी, आकांक्षा वाकडे, अभिषेक मोवाडे, मनश्री सोमण, सिया पारकर, अपूर्वा राणे या दिव्यांग मुलांनी फळभाज्यांचे ठसेकाम करून शरद पवार यांचे खास चित्र साकारले आहे.
9 / 10
आता, मुंबईतील कुलाबा येथील सेंट अँस गर्ल्स स्कुलमधील शबनम अन्सारी, आकांक्षा वाकडे, अभिषेक मोवाडे, मनश्री सोमण, सिया पारकर, अपूर्वा राणे या दिव्यांग मुलांनी फळभाज्यांचे ठसेकाम करून शरद पवार यांचे खास चित्र साकारले आहे.
10 / 10
धनंजय मुंडेंनी या चित्राचे फोटो आपल्या ट्विटर अकाऊँटवरुन शेअर केले आहेत.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDhananjay Mundeधनंजय मुंडेpainitingsपेंटिंग