Shweta Mahale: This MLA is the best in the country, said Chandrakant Patil
Shweta Mahale: 'या' आमदार देशात 'सर्वोत्कृष्ट, चंद्रकांत पाटील म्हणाले सार्थ अभिमान By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 9:14 PM1 / 8सिक्स सिग्मा एक्सलन्स अवॉर्ड तर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट आमदार हा पुरस्कार यंदा चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांना मिळाला आहे. 2 / 8'सर्वोत्कृष्ट आमदार 2022' हा पुरस्कार केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुरागजी ठाकूर यांच्या शुभहस्ते राजधानी दिल्ली येथे स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले.3 / 8सिक्स सिग्मा एक्सलन्स अवॉर्ड हा आशियातील सर्वात मोठा पुरस्कार असून आज 16 मार्च रोजी भारताचे पहिले माजी सीडीएस जनरल बिपीन_रावत यांच्या स्मरणार्थ दिल्ली येथे हा सोहळा संपन्न झाला.4 / 8लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मी विनम्रतेने माझ्या चिखली विधानसभा मतदारसंघातील जनतेच्यावतीने या सन्मानाचा स्वीकार केला, असे आमदार महाले यांनी म्हटले. 5 / 8अत्यंत काटेकोर नामांकन प्रक्रिया, अंतर्गत व बाह्य अंकेक्षण, सखोल विश्लेषणाद्वारे सर्वोच्च ज्युरी मंडळाने माझ्या कार्यकर्तृत्वाचे मूल्यांकन करून हा पुरस्कार जाहीर केला होता.6 / 8 सिक्स सिग्मा एक्सलन्स अवॉर्डस अँड लीडरशिप समिट 2022 चे आयोजक अध्यक्ष डॉ. प्रदीप भारद्वाज यांनी पुरस्काराविषयी पाठवलेल्या पत्रात म्हटले होते की, 'समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा आपला ध्यास कौतुकास्पद आहे.'7 / 8'हा नागरिकांचा सन्मान' हा सन्मान माझ्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा असून हा पुरस्कार मी जनतेलाच अर्पण करते, असेही श्वेता महाले यांनी म्हटले. 8 / 8दरम्यान, या अवॉर्डनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचं अभिनंदन केलं असून भाजपच्या महिला नारी शक्तीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असेही त्यांनी म्हटलंय. आणखी वाचा Subscribe to Notifications