Join us

मुंबई मेट्रोच्या भुयारातूनच थेट सिद्धी विनायक मंदिरात जाता येणार!, पाहा मेट्रोच्या भुयारीकरणाचे PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 5:14 PM

1 / 10
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ चे काम हाती घेण्यात आले आहे. आजघडीला या मार्गावरील भुयारीकरणाचे काम ९७ टक्के झाले असून, नागरी काम ८० टक्क्यांवर झाले आहे. (सर्व फोटो- दत्ता खेडेकर)
2 / 10
याच मार्गावर असलेल्या सिध्दी विनायक स्थानकाचे कामदेखील वेगाने सुरु आहे. आजघडीला या स्थानकाचे एकूण काम सुमारे ७० टक्के झाले असून, दिवसागणिक या कामाचा वेग वाढत आहे. (सर्व फोटो- दत्ता खेडेकर)
3 / 10
स्थानकावर सुमारे पाचशेहून अधिक कामगार, कर्मचारी काम करत असून, कोरोनाच्या दिड ते दोन वर्षांनी सिध्दी विनायकसह उर्वरित कामांनी पकडलेला वेग उल्लेखनीय आहे. (सर्व फोटो- दत्ता खेडेकर)
4 / 10
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिध्दी विनायक मेट्रो स्थानकातून थेट सिध्दी विनायक मंदिरात जाता येणार आहे.
5 / 10
देवस्थानाचे स्थानक असल्याने भविष्यातील सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून हे ओळखले जाईल, असाही दावा केला जात आहे.
6 / 10
मेट्रो-३ प्रकल्पात बहुतांश स्थानकं जमिनीखालीच असणार आहेत. स्थानकांच्या निर्माण कामात आता वेग आला आहे.
7 / 10
आज उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये भरपूर गर्दी असते. जिथे फक्त १,७५० प्रवासी बसू शकतात, तिथे ५००० लोक प्रवास करीत असतात. मेट्रो -३ मुळे हा भार जवळपास १५% कमी होणे अपेक्षित आहे. संपूर्ण ट्रेन वातानुकुलीत राहणार असल्यामुळे प्रवाश्यांना आवाजाच्या / धुळीच्या प्रदूषणाचा त्रास होणार नाही व त्यांचा प्रवास जास्त आरामदायी होईल.
8 / 10
मुंबई मेट्रो -३ ही कुलाबा–वांद्रे-सिप्झ पट्ट्यामधून धावेल व नरीमन पॉइंट, वांद्रे–कुर्ला संकुल, फोर्ट, लोअर परळ, गोरेगाव इत्यादी आर्थिक केंद्रांना सुद्धा जोडेल. मेट्रो मुळे विमानतळ, नरीमन पॉइंट, कफ परेड, काळबादेवी, वरळी, वांद्रे-कुर्ला संकुल, विमानतळ, सिप्झ व एमआयडीसी प्रथमच जोडले जातील. त्याशिवाय मुंबई मेट्रो -३ च्या मार्गामुळे चर्चगेट व छत्रपती शिवाजी टर्मिनल सारखी ऐतिहासिक वारसा असलेली स्थानके सुद्धा जोडली जातील.
9 / 10
मुंबई मेट्रो -३ मुळे रहदारीचा होणारा खोळंबा टाळता येईल व त्यात वाया जाणारा महत्वाचा वेळ वाचवता येईल. एकदा अंमलबजावणी झाल्यावर मुंबई मेट्रो -३ मुळे ह्या पट्ट्यातील रहदारी सुमारे ३५% ने किंवा वाहनसंख्या सुमारे ४.५० लाखांनी कमी होऊन रस्त्यांवरील कोंडी कमी होईल.
10 / 10
मुंबई मेट्रो -३ च्या गाड्यांचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्यांना ब्रेकिंग मधून ४०% रिजनरेटीव एनर्जी प्राप्त होईल. प्रकलपाची अंमलबजावणी झाल्यानंतर कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन सुरवातीपासूनच सुमारे १.०० लाख टनाने कमी होईल.
टॅग्स :Metroमेट्रोMumbaiमुंबईSiddhivinayak Ganapati Templeसिद्धिविनायक गणपती मंदिर