... So Devendra's name was engraved on his hand, Narendra patil told the story about mathadi melava
... म्हणून देवेंद्रांचं नाव हातावर कोरलं, नरेंद्रांनी सांगितला 'तो' किस्सा By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 7:09 PM1 / 10माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत आपली वेगळी चूल मांडली. मी पक्षात राहू नये असे काही नेत्यांना वाटत असल्याने मी शिवसेना सोडत असल्याचे त्यांनी म्हटले होते. 2 / 10भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे मैत्रीचे संबंध असल्याचे त्यांनी वारंवार बोलून दाखवले आहे. नुकतेच त्यांनी आपल्या हातावर देवेंद्र हे नावच गोंदून घेतलं आहे. त्यामुळे, त्यांचे देवेंद्र फडणवीसांवरील प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 3 / 10 नरेंद्र पाटील सध्या मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठीही पुढाकार घेऊन सभा आणि बैठकांना उपस्थिती लावत आहेत. मराठा आरक्षणाच्या लढाईत सभांमध्ये राज्य सरकारवर टीकाही करत आहेत. 4 / 10माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात चांगले संबंध आहेत ते शिवसेनेच्या नेत्यांना खूपत होते. तसेच मी शिवसेनेत राहू नये असे पक्षातील नेत्यांना वाटत असल्याने मी शिवसेना सोडण्याता निर्णय घेत आहे, असे नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा करताना सांगितले.5 / 10त्यानंतर, पाटील यांनी कुठल्याही पक्षात प्रवेश केला नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने ते सातत्याने बोलताना दिसले आहेत. फडणवीस यांच्यावरील त्यांचं प्रेम अनेकदा शब्दातून व्यक्त झालंय. 6 / 10आता चक्क देवेंद्र नावाचा टॅटूच त्यांनी गोंदलाय. ''जे पोटात तेच ओठात असणारे देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील एकमेव नेते आहेत. त्यांची कार्यपद्धती अन् कर्तुत्वाचे आपण फॅन झालोय,' असे नरेंद्र पाटील यांनी हा टॅटू गोंदल्यानंतर म्हटलं. 7 / 10फडणवीस यांच्यावरील त्यांचं प्रेम पुन्हा जगजाहीर झालंय. त्यामुळे पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकांवेळीचा एक किस्साही सांगितला. 8 / 102019 ला मी माथाडी समाजाच्या मेळाव्याला देवेंद्र फडणवीस यांना बोलावलं होतं. लोकसभा निवडणुकांवेळी मी राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये गेलो, मला भाजपात घेतलं नव्हत. 9 / 10त्यावेळी, पक्षामध्ये घेणं न घेणं ही तांत्रिक बाब असते. नरेंद्र तू माझ्या ह्रदयात आहेस, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. तसंच, देवेंद्रजी हेही माझ्या ह्रदयात आहेत. 10 / 10जो नेता महाराष्ट्रातील मराठा, ओबीसी, प्रत्येक समाजाला न्याय देतो, राजकारण करत नाही. त्या नेत्याच्या सहवासात राहायची, मार्गदर्शनात राहायची संधी मला मिळते, हे मला आवडते. मला आता खूप बरं वाटायला लागलंय, असेही पाटील यांनी म्हटलं. आणखी वाचा Subscribe to Notifications