Join us

...म्हणून मुंबईतलं मरिन ड्राइव्ह ठरतंय पर्यटकांच्या आवडीचं ठिकाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 2:14 PM

1 / 6
उंचच उंच लाटा, गगनचुंबी इमारते आणि अथांग समुद्र पाहायचा असल्यास पहिल्यांदा आठवण येते ती मुंबई शहराची. मुंबईतलं मरीन ड्राइव्ह शहर पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे.
2 / 6
रात्रीच्या काळोखात मरिन लाइन्सवरची स्ट्रीट लाइट ही महाराणीच्या गळ्यातल्या दागिन्यासारखी भासते. त्यामुळे त्या परिसराला क्वीन नेकलेसही संबोधलं जात असावं.
3 / 6
मुंबईतल्या गिरगाव चौपाटीपासून नरिमन पॉइंटपर्यंतच्या रस्त्याला मरिन ड्राइव्हच्या नावानं ओळखलं जातं. मुंबईकरांनी मरिन ड्राइव्ह हे आकर्षणाचं केंद्र आहे. मरिन ड्राइव्हला मलबार हिलशी जोडण्याचा एक प्रस्ताव होता.
4 / 6
जो 1860मध्ये सुरू करण्यात आला. परंतु काही कारणास्तव तो पूर्ण झाला नाही. त्यानंतर 1920मध्ये पुन्हा या प्रोजेक्टवर काम सुरू झालं.
5 / 6
परंतु त्यावेळीही अपयश आलं. अनेकदा या कामाला यश येत नसल्यानं ही योजना अपयशी ठरली. या योजनेसाठी 1500 एकर जमिनीचा वापर होणार होता. त्यानंतर त्या जमिनीचा आवाका घटवून 440 एकर करण्यात आला.
6 / 6
त्यातील 235 एकर जमीन लष्करानं घेतली. काही जमिनींवर इतर कार्य सुरू केलं. त्यात फक्त 17 एकर जमीन राहिली, तिला आज मरिन ड्राइव्ह म्हणतात.