Join us

रात्र महाविद्यालयांसाठी सेंट झेवियरमध्ये पार पडला खास कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2017 7:06 PM

1 / 6
सेंट झेवियर कॉलेजमध्ये 25 नोव्हेंबर रोजी देशभरातील रात्र महविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खास कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे नाव होते सितारे.
2 / 6
राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेसाठी देशभरातून अनेक विद्यार्थी झेवियरमध्ये दाखल झाले होते. त्यामध्ये बेंगळुरू, अहमदाबाद, पुणे, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, मालेगाव, इचलकरंजी आदी भागातील विद्यार्थ्यांचा समावेश होता.
3 / 6
या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धात भाग घेऊन आपले कला गुण सादर केले.
4 / 6
यश- अपयशाच्या पलीकडे जावून विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. अतिशय अटीतटीच्या या स्पर्धेत पुण्याच्या सेंट विन्स्लेट कॉलेजने प्रथम क्रमांक मिळवला.
5 / 6
या स्पर्धेसाठी देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी सेंट झेविअर कॉँलेजने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. राहणे, खाणे, प्रवासाचा खर्च देखील झेवियर कॉलेजने दिला.
6 / 6
विशेष म्हणजे सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकरण्यात आले नाही. झेवियरने घेतलेल्या या स्पर्धांचे सर्वांनी कौतुक केले. रात्र महाविद्यालयांसाठी अशा प्रकारच्या स्पर्धांची आवश्यकता असल्याचे अनेकांनी यावेळी सांगितले.