Join us

प्रवासी सुरक्षिततेसाठी स्टिकरचा आधार, मात्र मराठीची 'एैशी की तैशी'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 10:25 PM

1 / 6
मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाय योजना राबवण्यास सुरुवात केली.
2 / 6
याच धर्तीवर पश्चिम रेल्वेच्या बहुतांशी रेल्वे स्थानकांच्या पाय-यांवर विविध स्टीकर चिटकवण्यात आले आहेत.
3 / 6
मात्र स्टिकरवरील मराठी भाषा पाहता ‘मराठीची एैशी तैशी’ झाल्याचे दिसून येत आहे.
4 / 6
पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव आणि सांताक्रुझ स्थानकातील पादचारी पूलांच्या पाय-यांवर ‘कृपया लहान चेंडू घेऊ नका’,‘कृपया एकतर बाजूला ठेवा’, ‘कृपया हँड्राईल धरुन ठेवा’,  ‘कृपया एक पाऊल वगळू नका’ असा संदेश देणारे स्टिकर लावण्यात आले आहेत.
5 / 6
यामुळे प्रवासी जागरुकतेसाठी चिटकवण्यात आलेले स्टिकर सध्या प्रवासी हास्याचे विषय बनत आहेत.
6 / 6
विशेष म्हणजे, इंग्रजी संदेशाचे मराठीमध्ये भाषांतर करण्यासाठी गुगल ट्रान्सलेटरचा वापर करण्यात आल्याने हा घोळ झाल्याचे समजते.
टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलElphinstone Stampedeएलफिन्स्टन चेंगराचेंगरी