Join us

आता वाहतूक पोलीस तुमची गाडी थांबवू शकत नाही, चेकिंगही बंद होणार; नवा आदेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 1:36 PM

1 / 6
मुंबईकरांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय आला आहे. आता वाहतूक पोलिस तुम्हाला विनाकारण थांबवून त्रास देऊ शकणार नाहीत. तुमच्या गाडीची तपासणी केली जाणार नाही. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी नवा आदेश काढला आहे.
2 / 6
या नव्या आदेशात म्हटलंय की, वाहतूक पोलिसांनी गाड्यांची तपासणी करू नये. विशेषत: चेक नाका जिथे असेल तिथं वाहतूक मॉनेटरिंग केले जाईल. आणि वाहतूक सामान्यरित्या सुरळीत राहील यावर लक्ष देतील. पोलीस एखाद्या गाडीला तेव्हाच रोखतील जी वाहतुकीच्या वेगावर काही फरक पडत असेल.
3 / 6
अनेकदा वाहतूक पोलीस संशयाच्या आधारावर कुठेही गाडी थांबवतात आणि त्याची तपासणी करतात. ज्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे वाहतूक पोलिसांसाठी आदेश काढला आहे.
4 / 6
या आदेशात पोलिसांना गाड्यांची तपासणी करण्यापासून रोखलं आहे. अनेकदा तपासणीमुळे वाहतुकीची कोंडी होते. वाहतूक सुरळीत राहील याकडे लक्ष देण्याकडे प्राधान्य असावं. जर वाहन चालक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत असेल तर कायद्यानुसार त्याच्यावर आरोप निश्चित करून कारवाई करा
5 / 6
विनाकारण गाड्या थांबवू नका. केवळ नियमांचे उल्लंघन होत असेल तर त्या वाहनाला थांबवून कारवाई करा. या आदेशाचे सक्तीने पालन न केल्यास संबंधित चौकीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक जबाबदार ठरतील असं आदेशात म्हटलं आहे.
6 / 6
वाहतूक पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, वाहतूक पोलिसांनी संशयाच्या आधारावर वाहन तपासू नये आणि त्यांना थांबवू नये. परंतु पोलीस पूर्वीप्रमाणेच वाहतुकीच्या गुन्ह्यांविरूद्ध चलान देत राहतील आणि वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांना रोखतील.
टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसHemant Nagraleहेमंत नगराळे