Join us

झोपडीत राहणाऱ्या तरुणानं नाकारली रतन टाटांची ऑफर; बंद लिफाफ्यात दिला चेक अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 3:24 PM

1 / 10
वय ३०, तो जन्मापासूनच गरिबीने त्रस्त होता. मुबंईच्या कुलाबा येथे झोपडपट्टीत वृद्ध आई, पत्नी आणि ३ वर्षाच्या मुलासह राहतो. अशा स्थितीत मुंबईसारख्या महानगरात घर खरेदी करण्यासाठी उद्योगपती रतन टाटा यांच्याकडून बंद लिफाफा मिळाला तर तो घेण्यास कोणी नकार देईल का? कदाचित तुम्ही म्हणाल- नाही, पण कलाकार निलेश मोहिते याने ही ऑफर विनम्रपणे नाकारली निलेशने रतन टाटा यांना मदतीच्या ऐवजी काम देण्यास सांगितले. निलेशची ८ बाय ८ खोली बघितली तर फक्त पेंटिंग्ज दिसतात.
2 / 10
बायकोसोबत बसलेला निलेश जेव्हा त्याची कहाणी सांगतो तेव्हा त्याचे डोळे पाणावले होते. तो म्हणतो, गावात इतकी गरिबी होती की २००९ च्या सुमारास रायगडहून मुंबईत आलो. पप्पांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे घरात रोज भांडणे होत होती. त्यानंतर ते वेगळे राहू लागले. मात्र, ते मनाने चांगले होते. माझ्या आई आणि बहिणीसोबत मी कुलाब्याच्या मच्छिमार कॉलनीतील झोपडपट्टीत भाड्याने राहत होतो. वडिलांच्या नशेमुळे घरची परिस्थिती हलाखीची झाली. कधी कधी पाण्याबरोबर बिस्किटे खावी लागली.
3 / 10
घर चालवण्यासाठी इतरांच्या घरी स्वयंपाक करणे, झाडू मारणे, भांडी धुणे ही कामे आई करू लागली. याचा आईच्या तब्येतीवर परिणाम झाला. तिची प्रकृती ढासळू लागली. ऑपरेशन करावे लागले. डॉक्टर म्हणाले की आता आईला काम सोडावे लागेल. मी त्यावेळी ९वीत होतो. घरात कमावणारे कोणी नव्हते. मी माझा अभ्यास सोडला. शालेय दिवसांपासून चित्रकलेचा छंद जोपासू लागला.
4 / 10
मला ते दिवसही आठवतात जेव्हा मी फळ्यावर खडूने चित्र काढायला सुरुवात केली. वर्ग बंक करून चित्रकलेचे प्रदर्शन पाहायला जायचा. एकदा मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत प्रसिद्ध कलाकार एम एफ हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन पाहायला गेलो होतो, तिथून मला चित्रकलेचे वेड लागले. आई आजारी पडल्याने मला शाळा सोडावी लागली. घर चालवण्यासाठी ऑफिस बॉय म्हणून काम करू लागलो. सकाळी काही तास हे काम केल्यानंतर तो दुसऱ्या कार्यालयात गार्ड आणि शिपाई म्हणून काम करायचो. हे काही वर्षे चालले.
5 / 10
मी अजून थोडं शिकावं असं लोकं सांगायची. त्यानंतर कामाबरोबरच पुढील अभ्यासासाठी रात्रशाळेत प्रवेश घेतला. मात्र, अनेकवेळा असे घडले की पैसे कमवण्यासाठी ते क्लासेस चुकवायचे. त्यामुळे ऑफिस बॉयचे काम सोडून त्याने हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करू केले. रात्री काम करायचे आणि दिवसा रंगकाम करायचे. हळूहळू चित्रकला माझी आवड बनली. त्यात मी एवढा प्राविण्य झालो की मी राजे-महाराजावांची चित्रे काढायला सुरुवात केली.
6 / 10
हॉटेलमध्ये एका ग्राहकाला चहा देत असताना मी ट्रेमध्ये ठेवलेल्या पेपर नॅपकिनवर समोर बसलेल्या ग्राहकाचे चित्र काढू लागलो. हॉटेलच्या सुपरवायझरने मला पाहिल्यावर तो ओरडतच आला. मला शिव्या घालू लागला म्हणाला- तुला ह्यासाठी पैसे मिळतात का? पण जेव्हा त्याने माझे चित्र पाहिले तेव्हा तो थक्क झाला. तो म्हणाला- मी तुला काही मोठ्या लोकांशी ओळख करून देतो. तु उत्तम चित्रे बनवू शकतो. त्याची विक्रीही करू शकतो असं त्याने सांगितले. इथून माझ्या छंदाचे व्यवसायात रूपांतर झाले. हळूहळू चित्रकलेच्या ऑर्डर्सही येऊ लागल्या.
7 / 10
मी रतन टाटा यांच्याकडून खूप प्रेरित आहे. २०१७ मध्ये मी रतन टाटा यांची काही पेंटिंग्ज बनवली होती, जी मला त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट द्यायची होती. कित्येक महिने, आठवड्यातून दोन-तीन दिवस निलेश त्याच्या बंगल्याबाहेर जाऊन उभा असायचा. टाटा निघताना गाडीत बसलेले मला दिसले. थेट भेटण्याचा मार्ग नव्हता. माझी एक ओळखीची व्यक्ती टाटांच्या बंगल्यावर जायची. मी त्याला माझी टाटाशी ओळख करून देण्यास सांगितले. २०१८ मध्ये पुन्हा त्यांचा वाढदिवस गेला. यावेळी मी त्याचे एक मोठे चित्र काढले. जेव्हा त्यांनी मला पेंटिंगबद्दल विचारले तेव्हा मी म्हणालो- माझे घर या पेंटिंगपेक्षा थोडे मोठे आहे. ते ठेवणे खूप कठीण आहे. त्यामुळे मला जास्त चित्रे काढता येत नाहीत.
8 / 10
मी एका छोट्या खोलीत राहतो हे रतन टाटा यांना कळल्यावर त्यांनी मला एक बंद लिफाफा देऊ केला. त्यात एक चेक होता, तो किती होता माहीत नाही. रतन टाटा म्हणाले, 'निलेश यातून मुंबईत घर खरेदी केले. मग तुम्ही आणखी चित्रे बनवू शकाल. मी चेक घेण्यास नकार दिला, त्यांना म्हणालो- तुम्हाला मला काही द्यायचे असेल तर मला काम द्या. कामाची आवश्यकता आहे. हे ऐकून टाटा हसायला लागले. म्हणाला- बरं, तुझ्या क्षमतेचं काही असेल तर आमचे अधिकारी कळवतील असं टाटांनी ऑफर दिली.
9 / 10
दरम्यान, कोरोना काळात लॉकडाऊन लागल्याने अडीच वर्ष रतन टाटा यांची भेट होऊ शकली नाही. लॉकडाऊनंतर मी त्यांना पुन्हा भेटायला गेलो. या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये त्यांनी हॉटेल ताजमध्ये माझ्या चित्रांचे प्रदर्शन भरवले. त्यांनी दोन महिन्यांत २१ पेंटिंग्ज बनवून हॉटेल ताजमध्ये प्रदर्शित केल्या.
10 / 10
ज्यावेळी मी माझे चित्रप्रदर्शन हॉटेल ताजमध्ये लावले तेव्हा तिथला स्टाफ मग तो साफसफाई कर्मचारी असो वा वेटर, मॅनेजर त्यांनी कधीही मी एक झोपडपट्टीतील मुलगा आहे हे जाणवू दिले नाही. तेथील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला. टाटांचे संस्कार त्यांच्या ताज फॅमिलीत रुजल्याचं दिसून आले. ताज हॉटेलमधील प्रत्येक क्षण, आठवणी माझ्या जीवनातील खूप मोठे क्षण आहेत असं निलेशने सांगितले.
टॅग्स :Ratan Tataरतन टाटा